Bollywood actor kabir bedi 
मनोरंजन

Kabir Bedi: तीन लग्न, एक अफेयर, वयाच्या सत्तरीत चौथं लग्न

बॉलीवूडमध्ये (Bollywood Movies) असे काही अभिनेते आहेत ज्यांच्या नावाची चर्चा ही नेहमीच त्यांच्या भोवतीच्या चर्चेनं होत असते.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये (Bollywood Movies) असे काही अभिनेते आहेत ज्यांच्या नावाची चर्चा ही नेहमीच त्यांच्या भोवतीच्या चर्चेनं होत असते. त्यामध्ये अभिनेता कबीर बेदीचं (Actor Kabir Bedi) नाव घ्यावं लागेल. हा अभिनेता कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्याचं अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं. मात्र त्यानं आपल्यावर झालेल्या आरोपांना कधी उत्तर दिलं नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचं आत्मचरित्र प्रकाशित झालं होतं. त्यामध्ये त्यानं अनेक खळबळजनक गोष्टींचा खुलासा केला होता. आज त्याचा जन्मदिन (Happy Birthday Kabir Bedi) आहे. त्यानिमित्तानं आपण त्या अभिनेत्याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

दिग्गज अभिनेता कबीर बेदी (Kabir bedi)यांचा आज 76 वा जन्मदिन आहे. 1971 मध्ये त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यात ते यशस्वीही झाले. त्यांनी 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या अभिनेत्याच्या अभिनयाशिवाय त्याच्या वैयक्तिक गोष्टींशीच मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे दिसून आले आहे. या अभिनेत्याची प्रेमप्रकरणे, त्यातून झालेले वाद, त्या वादाला सोशल मीडियातून मिळालेलं खतपाणी याचा परिणाम बेदींच्या व्यक्तिमत्वावर झाल्याचे दिसून आले. बेदी यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींना आपण उजाळा देणार आहोत.

अभिनेत्यानं सहा वर्षांपूर्वी आपल्या 70 व्या जन्मदिनाच्या एक दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड परवीन दोसांजशी लग्न केलं होतं. परवीन ही मॉडेल आणि एक फिल्म प्रो़ड्युसर आहे. ती कबीर बेदीपेक्षी तीस वर्षांनी लहान आहे. अभिनेता कबीर बेदी आणि परवीन हे गेल्या सात वर्षांपासून लिव इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा विचार केला. नेहमीप्रमाणे जेव्हा कबीर बेदी यांनी हा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याला न जुमानता लग्न केले. यापूर्वी कबीर बेदी यांनी डान्सर प्रोतिमा बेदी यांच्याशी लग्न केले. त्यानंतर त्याचं परवीन बाबींशी प्रेमप्रकरण सुरु झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT