Bollywood actor kartik aaryan shares hilarious side effects of covid19.jpg
Bollywood actor kartik aaryan shares hilarious side effects of covid19.jpg 
मनोरंजन

'कोरोनानंतर मला सगळं उलट दिसतयं' कार्तिकने केला खुलासा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता कार्तिक आर्यनने काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे सोशल मिडियावर सांगितले होते. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी सोशल मिडियावर कमेंट करून काळजी व्यक्त केली. कार्तिक होम क्वारंटाइन झाला होता. तो सध्या सोशल मिडियावर खूप सक्रिय असतो. नुकतीच त्याने करोनावर मात केली आहे. याबाबत त्याने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

कार्तिकने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो हातावर चालत असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये कार्तिकने पायवर करून हाताच्या जोरावर फोटोसाठी पोज दिली आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की, 'कोरोनानंतर सगळं उलट दिसत आहे. सुप्रभात!'. काही दिवसांपूर्वी अशीच एक विनोदी पोस्ट त्याने केली होती. महाराष्ट्र सरकारने रात्री कर्फ्यूची घोषणा केली तेव्हा कार्तिकने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्यंगात्मक टिप्पणी पोस्ट केली. तेव्हा त्याने सेल्फी पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले, 'माझे लॉकडाऊन झाले, तुमच्या सगळ्याचा नाईट कर्फ्यु सुरु झाला'

22 मार्चला कार्तिकने सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. 'पॉझिटिव्ह हो गया, दुआ करो' असे कॅप्शन त्या पोस्टला कार्तिकने दिले. या पोस्टला कमेंट करून त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आणि तो बरा व्हावा त्यासाठी प्रार्थना केली. कार्तिक सध्या त्याच्या आगामी हॉरर- कॉमेडी चित्रपट 'भूला भुलैया 2' ची  शूटिंग करीत आहे. या चित्रपटात तो तब्बू आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' या चित्रपटाचा रिमेक आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. बॉलिवूडमधील परेश रावल, फातिमा सना शेख, रणबीर कपूर, रोहित सराफ या दिग्गज कलाकारांना कोरोणाची लागण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT