actor nasseruddin shah 
मनोरंजन

'तर आम्ही वीस कोटी मुसलमान लढू'! नसिरुद्दीन शहांचं वक्तव्य

आपली भूमिका रोखठोकपणे मांडणे आणि त्यावर ठाम राहणे यामध्ये वर्गामध्ये बसणारे काही मोजकेच कलाकार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आपली भूमिका रोखठोकपणे मांडणे आणि त्यावर ठाम राहणे यामध्ये वर्गामध्ये बसणारे काही मोजकेच कलाकार आहेत. त्यामध्ये प्रख्यात अभिनेते नसिरुद्दीन शहा (bollywood actor nasseruddin shah) यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. प्रतिभावान अभिनेते म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. त्यांनी आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून नसिरुद्दीन शहा हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे देखील चर्चेत आले आहे. त्यांचे आताचे एक विधान त्यांची डोकेदुखी वाढवणारे ठरताना दिसत आहे.

एका न्युज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन यांनी धार्मिक विधानं केली आहेत. त्याचं झालं असं की, काही जहाल मतवादी विचारांच्या धार्मिक संघटनांनी मुस्लिम व्यक्तींची हत्या करण्याची धमकी दिली. त्यावरुन भडकलेल्या नसिरुद्दीन शहा यांनी आपली भूमिका मांडली आहे. शहा म्हणाले, मला तर आता लोकांवर विश्वासच राहिलेला नाही. त्याचे कारण म्हणजे लोकं काय विचार करतील हे सांगता येत नाही. अनेकांना या देशामध्ये धर्माच्या नावावर युद्ध सुरु करायचं आहे. त्यांना याठिकाणी शांतता नको आहे. काही करुन वातावरण दुषित कसे होईल याचाच विचार सतत केला जातो. हे सांगावं लागेल.

या देशामध्ये आता वीस कोटी मुस्लिम आहेत. आम्ही सगळे भारतीय आहोत. भारताचे आहोत. जर कोणी आम्हाला विनाकारण त्रास देत असल्यास आपण काय बोलावं, अनेकांना उगाचच त्रास द्यायला आवडते. त्यांना काही करुन वाद निर्माण करणं हेच ध्येय असतं. अशावेळी फार जपून वागण्याची गरज असते. माथेफिरु आपल्याला भडकवात. अशावेळी संयमही महत्वाचा आहे. आम्हीही या देशाचे आहोत हे ऐकुनही आम्हाला विनाकारण त्रास देत असल्यास आम्हीही त्यांचा लढून सामना करु. असे शहा यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी सोन्याच्या भावात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग?

माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत येणार, राजू शेट्टींनी सांगितली तारीख; सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका सध्या तरी नाही!

Wes Paes Passes Away : भारतीय क्रीडाविश्वाला धक्का! ऑलिम्पिकपदक विजेत्या खेळाडूचं निधन, BCCI सोबतही केलंय काम

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा अपघात, पोलिसात केली तक्रार, पोस्ट शेअर करत म्हणाली...' माझ्या गाडीला धडक दिली आणि...'

Auto Parts Theft: मॅनेजरकडून कंपनीची फसवणूक; लोखंडी पार्ट्स विकून ३ लाख ४५ हजारांचा आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT