Genelia Video news  esakal
मनोरंजन

Genelia Video: 'रितेश तुझं आता खरं नाही! का म्हणतेय जेनेलिया असं?'

बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलियाकडे पाहिले जाते. हे दोन्ही सेलिब्रेटी वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत असतात.

युगंधर ताजणे

Ritesh Deshmukh And Genelia Dsouza Video: बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलियाकडे पाहिले जाते. हे दोन्ही सेलिब्रेटी वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत असतात. सोशल मीडियावर तर त्यांनी शेयर (Bollywood Celebrity) केलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या काळात तर रितेश आणि जेनेलियानं भन्नाट व्हिडिओ शेयर करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता जेनेलियानं शेयर केलेल्या व्हिडिओनं तर नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. त्यामुळे लटक्या रागात तर जेनेलियानं रितेशला चांगलेच सुनावले आहे. सध्या सोशल मीडियावर या दोन्ही सेलिब्रेटींनी चाहत्यांना आपल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

रितेशनं जेनेलियाचा तो व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये जेनेलियाचा लूक पाहून तुम्हाला धक्काच बसेल. आपण काय पाहतो आहोत असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. जेनेलियाला मिशा आल्या आहेत. असे त्यात दिसत आहे. त्यामुळे चिडलेल्या जेनेलियानं रितेशला तर धमकीच दिली आहे. त्यात ती म्हणते आता तुझं काही खरं नाही. रितेशला तो व्हिडिओ शेयर करणे महागात पडणार की काय असं नेटकऱ्यांना वाटू लागले आहे. सोशल मीडीयावर हे दोन्ही सेलिब्रेटी वेगवेगळ्या प्रकारचे गंमतीशीर व्हिडिओ शेयर करताना दिसतात. त्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो.

रितेशनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये फिल्टरचा वापर केला आहे. जेनेलियाच्या चेहऱ्यावर मिशा आलेल्या दिसत आहे. यात गंमतीशीर गोष्ट अशी की, तिला तो व्हिडिओ फिल्टर लावून शुट करत असल्याचे माहिती नाही. त्यामुळे तिनं नेहमीप्रमाणे एकदम दिलखुलासपणे रितेशच्या त्या व्हिडिओमध्ये भाग घेतला आहे. जेव्हा तो व्हिडिओ समोर आला तेव्हा मात्र तिला धक्काच बसला. नेटकऱ्यांना तर हसू आवरत नव्हते. चिडलेल्या जेनेलियानं तर रितेशला तो व्हिडिओ पाहून थेट धमकीच दिली आहे.

रितेशनं तो व्हिडिओ शेयर करताना लिहिलं आहे की, माझा पती जेनेलिया...त्यावर जेनेलियानं त्याला उत्तर दिले आहे. त्यात ती म्हणते, आता तुझं काही खरं नाही रितेश. तुझ्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. त्यांच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना फॅन्सनं लिहिलं आहे की, जेनेलिया ही सेम टू सेम रितेश सारखीच दिसते आहे. तुम्ही दोघेजण खूप गोड आहात. अशा प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या आहेत. रितेश - जेनेलियाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ते 'मिस्टर मम्मी' मध्ये दिसणार आहे. त्यात रितेश हा प्रेग्नंट पतीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT