Ritesh Deshmukh news esakal
मनोरंजन

Ritesh Deshmukh: तू काही केलं तरी डिस्काउंट नाही'!

बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटी हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात.

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटी हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी (Ritesh Deshmukh) अभिनेत्री जेनेलिया यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. (Genelia Deshmukh) गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही सेलिब्रेटी सोशल मीडियावरील वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमांतून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. काल फादर्स डे होता. त्यानिमित्तानं रितेशनं एक खास व्हिडिओ शेयर (Entertainment News) केला आहे. रितेशनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी काही मिश्किल कमेंटही केल्या आहेत. एकानं तर काही झालं तरी तुला डिस्काउंट मिळणार नसल्याचे सांगितलं आहे.

बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी मोठ्या उत्साहात फादर्स डे सेलिब्रेट केला. कालपासून सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या पोस्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद (Entertainment News) मिळाला आहे. रितेशनं देखील जेनेलिया आणि आपल्या मुलांसोबत मोठ्या उत्साहात फादर्स डे सेलिब्रेट केला आहे. त्यानिमित्तानं एक खास व्हिडिओ देखील शेयर केला आहे. त्याला नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंटस देखील मिळाल्या आहेत. रितेशनं शेयर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव झाला आहे. रितेश आणि त्याचं कुटूंब हे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलं होतं. त्यावेळी रितेशनं लहान मुलांच्या हटक्या स्टाईलमध्ये फोटो शेयर केला आहे.

रितेशसह सगळ्यांच्या तोंडात चॉपस्टिक असून तो फोटो नेटकऱ्यांच्या थट्टेचा विषय आहे. अनेकांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एकानं तर तू कितीही लहान मुलासारखे केलेस तरी देखील तुला डिस्काउंट मिळणार नाही. असं सांगितलं आहे. रितेशनं शेयर केलेल्या फोटोला एक छान कॅप्शनही दिली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, बाप होणं हे एक सौभाग्य आहे तर चांगला बाप होणं ही मोठी जबाबदारी आहे. एक महान पिता होणं याचा अर्थ तुम्हाला चांगली आई देखील होता आलं पाहिजे. असं त्या कॅप्शनमध्ये रितेशनं म्हटलं आहे.

एकानं ज्यावेळी रितेशला तुला कोणत्याही प्रकारचा डिस्काउंट मिळणार नाही असं सांगितलं होतं. त्यावर रितेशनं त्याला जशास तसे उत्तर दिले आहे. त्यानं मी काही हे डिस्काउंट साठी केलेलं नाही. मला माझ्या मुलांसोबत खेळण्याचा आनंद मिळतो. हे सारं माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. असे रितेशनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT