bollywood celebrity 
मनोरंजन

बॉलिवूडमधील या कलाकारांनी घेतला व्हॅक्सिनचा पहिला डोस; पाहा PHOTO

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढत असून पुणे आणि मुंबई हॉटस्पॉट बनले आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. दरम्यान, देशभरात व्यापक अशा लसीकरण मोहिमेला सुुरुवात झाली असून या सेलिब्रिटींनी लस घेतली आहे. लसीबाबत नागरिकांमध्ये असेलली भीती दूर करण्यासाठी सेलिब्रिटींनी चाहत्यांना खास मेसेजही दिला आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने नुकताच कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला. मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये सलमानने लस घेतली. लिलावती हॉस्पिटलमध्ये सलमान दाखल होताच त्याच्या चाहत्यांना काळजी वाटली पण तो व्हॅक्सिनसाठी गेल्याचे कळाल्यावर त्यांची चिंता मिटली. सलमानसोबतच त्याच्या आई-वडिलांनीदेखील लसीची पहिला डोस घेतला. 

बॉलिवूडमध्ये आपल्या स्टईल आणि हटके अंदाजामुळे  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलाकार म्हणजे संजय दत्त. संजयने लस घेतानाचे फोटो शेअर करून कॅप्शन लिहीले,'बीकेसी व्हॅक्सिन सेंटरमध्ये आज मी कोव्हिड-19 व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला मी डॉक्टर डेरे आणि त्यांच्या पुर्ण टीमचे एवढे चांगले काम करण्यासाठी अभिनंदन करतो. मला त्यांच्या मेहनती विषयी प्रेम आणि सन्मान वाटतो.जय हिंद!'.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान निर्माण करणारा कलाकार म्हणजे अनुरपम खेर. अनुपम यांनी देखील कोरोनावर लसीचा पहिला डोस घेतला आहे. 

सैफ अली खानच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होताच सैफ आणि करिना विशेष काळजी घेत आहेत. नुकतीच सैफने कोरोना व्हॅक्सिनची पहिली लस घेतली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी असणाऱ्या हेमा मालिनी यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे. 

परेश रावल,राकेश रोशन, धर्मेंद्र या कलाकरांनी कोरोनाचा पहिला डोस  घेतला आहे.

डोस घेतानाचे फोटो या कलाकारांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT