sanjay dutt 
मनोरंजन

संजूबाबाने सांगितला जेलमधला अनुभव; प्रेक्षक झाले भावूक

सकाळ ऑनलाइन

अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित 'संजू' हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. एप्रिल १९९३ मध्ये संजूबाबाला अटक झाली. 'संजू' या चित्रपटात त्याचा कारागृहातील प्रवाससुद्धा दाखवण्यात आला होता. मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शकांनी काही गोष्टी खोट्या दाखवल्या, असेही आरोप अनेकांकडून झाले. आता संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये त्याने जेलमधला त्याचा अनुभव सांगितला आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये संजूबाबा याबद्दल व्यक्त झाला होता. 

"मला जामिन कधी मिळेल या आशेवर मी जगत होतो. कारागृहात असताना सतत तोच विचार मनात यायचा. तेव्हा जेलमधल्या एका व्यक्तीने मला सांगितले की, तू जेव्हा आशा बाळगणं बंद करशील तेव्हाच तुझे कारागृहातील दिवस लवकर संपतील. अपेक्षा ठेवू नये, यांसारख्या अनेक गोष्टी मी जेलमध्ये राहून शिकलो. तिथे एकासोबत माझी मैत्रीसुद्धा झाली होती. त्याच्यासोबत मी न्यूजपेपर बॅग्स तयार करायचो .त्यावेळी मला एका बॅगचे 20 पैसे मिळायचे. एका दिवसात मी 50 ते 100 बॅग्स तयार करत होतो," असं संजय दत्तने सांगितलं.            

कारागृहातून बाहेर आल्यानंतर संजयने भूमी, सडक 2 या चित्रपटांमध्ये काम केलं. संजयचा केजीएफ 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील संजयचा लूक आणि त्याची भूमिका हटके असल्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. संजूबाबाच्या बोलण्याच्या, चालण्याच्या स्टाईलला अनेक जण कॉपी करतात. 'रॉकी' चित्रपटातून संजयने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तेजा, वास्तव, खलनायक, लगे रहो मुन्ना भाई, मुन्ना भाई एम बी बी एस या हिट चित्रपटांमधून संजय प्रेक्षकांच्या भेटीस आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT