bollywood actor shashi kapoor ran after shatrughan sinha with belt to hit him 
मनोरंजन

लाज कशी वाटत नाही; शशी कपूर पट्टयानं मारणार होते शत्रुघ्न सिन्हांना

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - खर्जातील आवाज, भेदक नजर, वेगळी अभिनय शैली यामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे कलावंत म्हणून शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव घेतले जाते. आपल्या अभिनयानं त्यांनी बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केली. बॉलीवूडमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचे किस्से प्रसिध्द आहेत. त्यांचा आणि प्रख्यात अभिनेते शशी कपूर यांचा एक प्रसंग त्यावेळी खूप लोकप्रिय झाला होता. शशी कपूर हे शत्रुघ्न सिन्हा यांना मारण्यासाठी त्यांच्या मागे पट्टा घेऊन धावले होते. त्यावेळी शशी यांना शत्रुघ्न सिन्हा यांचा भयंकर राग आला होता.

शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या रागीट स्वभावाबद्दलही प्रसिध्द आहेत. त्यांच्या अशाच रागीटपणाचा अनुभव शशी यांना बसला होता. त्यावेळी त्या किश्याची चर्चाही बराचकाळ बॉलीवूडमध्ये रंगली होती. शशी यांच्या मनात शत्रुघ्न यांच्याविषयी जो राग होता तो निवळण्यासाठी शत्रुघ्न यांना वाट पाहावी लागली. शत्रुघ्न सिन्हा यांनी इ टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, मला सेटवर पोहचण्यास नेहमी उशीर होत असे. त्यावरुन मला अनेक दिग्दर्शक, निर्माते यांचे बोलणे खावे लागले आहे. माझी ती सवय काही जाता जात नव्हती. त्यावेळी शत्रुघ्न यांच्या सह कलाकारांना तीन तीन तास वाट पाहावी लागत असे.

एकदा काय झाले, आमच्या एका चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होते. मला त्यावेळी सेटवर पोहचण्यास उशीर झाला होता. त्या चित्रपटात शशी कपूरही होते. तेव्हा शशी कपूर पट्टा घेऊन माझ्या पाठीमागे धावले. ते भयंकर चिडले होते. त्याचे कारण असे की, मी उशीरा आलो होतो. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला वेळेची मर्यादा आहे म्हणून आणि मला माझ्यातील टँलेट पाहून या चित्रपटासाठी निवडण्यात आले आहे. त्यावर शशी कपूर मला म्हणाले, किती बेशरमपणे तु हे सांगतो आहेस. हा किस्सा सांगताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, हा आमच्यातील एक गंमतीदार प्रसंग होता. माझे आणि शशी कपूर यांचे संबंध चांगले होते.

यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ यांच्याबरोबरील एक प्रसंग शेयर केला. ते म्हणाले, मी काही वेळा सेटवर लवकर पोहोचलो होतो. एकदा मी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर चित्रपट करत होतो. आम्हाला पहाटे साडेचार वाजता बोलावले होते. आणि मी वेळेत पोहोचलो होतो. याशिवाय गौतम घोष यांच्या अंर्तजली चित्रपटासाठी आम्ही कोलकाता शहरात शुटींग करत होतो. तेव्हा मला आठवतेय की मी लवकर उठून शुटींग केले होते. मी कधीही जाणूनबुजून सेटवर उशीरा पोहोचलो नाही. मला रोज योगा करण्याची सवय होती. त्यासाठी मला वेळ लागत असे. हे मान्य की मी कित्येकवेळा अनेक चित्रपटांच्या सेटवर उशिरा पोहोचलो. मात्र स्मरणशक्ती चांगली असल्याने एकदा वाचलेले डायलॉग मी एका टेक मध्ये संपवत असे. अशी आठवणही शत्रुघ्न यांनी यावेळी सांगितली.  
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : 'its very serious issue' सर्वोच्च न्यायालयात वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, CJI सूर्यकांतही संतापले, खटला अतिशय गंभीर

Student Security Issue : विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर; शिकवणी वर्ग अधिनियम अस्तित्वात येणार कधी?

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

SCROLL FOR NEXT