Sidharth Malhotra Esakal
मनोरंजन

Sidharth Malhotra: सिद्धार्थच्या अफेअरची लिस्ट भली मोठी! कियारा आधी 'या' अभिनेत्री होत्या रांगेत..

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने स्वत:चा मेहनतीने बॉलीवूडमध्ये ठसा उमटवला आहे. सिद्धार्थच्या अभिनयाचेच नाही तर लोक त्याच्या लूकचेही चाहते कमी नाही. आज 16 जानेवारीला सिद्धार्थ त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. सिद्धार्थच्या लिंक अपच्या बातम्या त्याच्या चित्रपटांच्या नायिकांसोबत आल्या आहेत. त्याचं बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीसोबत नावे जोडली गेली.

Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

आलिया भट्ट

2012 मध्ये करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरमधून बॉलिवूडमध्ये सिद्धार्थ आणि आलिया भट्टने एकत्र पदार्पण केले. तेव्हा पासून या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होऊ लागल्या. त्यांची जोडी नेहमीच चर्चेत राहिली. जरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाहीत. 2017 मध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि दोघेही त्याच्या आयुष्यात पुढे गेले.

जॅकलिन

2017 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​'अ जेंटलमॅन'मध्ये चित्रपटामध्ये जॅकलिनसोबत दिसला होता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला मात्र त्यांनतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. जॅकलिनसोबतच्या नात्याबद्दल बोलताना तो म्हणाला की जॅकलिन अप्रतिम आहे. मला तिच्यासोबत प्रवास करायला मजा येते. आम्ही दोघं 'अ जेंटलमन' करत होतो तेव्हा दोघेही चांगले मित्र झालो. आम्ही कधीही डेट केले नाही. सिद्धार्थच्या आलियासोबतच्या ब्रेकअपचे कारणही जॅकलिन असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण ती केवळ अफवा होती.

तारा सुतारिया

जॅकलिननंतर सिद्धार्थचे नाव तारा सुतारियाशी जोडले गेले. त्यांची भेट 'मरजावां' चित्रपटात झाली. सिद्धार्थ ताराचा क्रश असल्याबद्दलही बोलली. मात्र,आम्ही भेटलो त्या दिवसापासून लोक आमच्या केमिस्ट्रीबद्दल बोलू लागले, असेही तो म्हणाला. मात्र, आमच्यात तसं काही नव्हते.

कियारा

शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियाराची जवळीक वाढू लागली. दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे आणि अनेकदा एकत्र दिसले. इतकेच नव्हेतर यावेळी न्यू इयर देखील दोघांनी सोबत साजरा केला. दोघांना एकत्र पाहणं हे चाहत्यांनां आवडते, पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाही. तरीही या दोघांच्या लग्नाबद्दलची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT