Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput esakal
मनोरंजन

सुशांतसिंग प्रकरणाची RTI व्दारे माहिती मागितल्यावर CBI चे धक्कादायक उत्तर

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होणार आहे. यापूर्वी (Entertainment News) त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होती. मात्र त्यानंतर त्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. (Mumbai Police) अजून त्या प्रकरणाचा कोणताही अहवाल समोर आलेला नाही. आता राजपुत प्रकरणाच्या तपासाची माहिती आरटीआय अंतर्गत मिळावी अशी (Bollywood Actors) मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यावेळी सीबीआयनं त्यांना दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. सीबीआयचं म्हणणं आहे की, असं जर केलं तर आमच्या तपासात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सध्या तरी आरटीआय अंतर्गत कोणतीही माहिती देणं बरोबर ठरणार नाही.

आरटीआयच्या मागणीवर सीबीआयनं मोठा खुलासा केला आहे. आणि ठामपणे आपली बाजु मांडली आहे. 14 जुन 2020 मध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुतनं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेलं नाही. त्यानं नैराश्यातून असे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणामध्ये बॉलीवूडमधील अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्यामध्ये ड्रग्ज प्रकरणानं बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयला एक आरटीआयचा अर्ज मिळाला आहे. त्यात त्याच्या आत्महत्या प्रकरणाची माहिती मिळावी असे म्हटले आहे. सुशांत प्रकरणात अद्याप तपास सुरु आहे. त्यामुळे अजुनही त्याबाबत कोणतीही माहिती आरटीआय अंतर्गत दिली जाणार नाही. असे सीबीआयनं म्हटलं आहे.

सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा हा होता. त्याच्या निधनानंतर डिज्नी हॉटस्टारच्या वतीनं प्रदर्शितही झाला होता. त्यात त्याच्या समवेत संजना गांधीनं प्रमुख अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली होती. सुशांतच्या चाहत्यांची मागणी लक्षात घेता हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी मोफत दाखवण्यात आला होता. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून त्याच्या पश्चात वडिल के के सिंग, चार बहिणी या घटनेचा सातत्यानं पाठपुरावा करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT