मनोरंजन

'आता कसा बोलला'!, अखेर विकी कौशलनं दिली गोड बातमी

विकी कौशल आणि कॅटरीना कैफच्या रिलेशनशिपच्या गोष्टी या दोघांच्याही चाहत्यांना काही नवीन नाही.

युगंधर ताजणे

मुंबई - विकी कौशल आणि कॅटरीना कैफच्या रिलेशनशिपच्या गोष्टी या दोघांच्याही चाहत्यांना काही नवीन नाही. यापूर्वी अनेकदा त्यावरुन सोशल मीडियामध्ये चर्चा झाली आहे. मात्र आताची बातमी वेगळी आहे.त्यामध्ये विकी कौशलनं जाहीर सांगितलं आहे की, आता वेळ आली आहे एकत्र येण्याची. त्यानं ती गोड बातमी देऊन दोघांच्याही चाहत्यांना दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वी विकीनं गुपचूप साखरपूडा केल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यावरुन त्या दोघांनाही ट्रोल करण्यात आले होते. हे प्रकरण एवढं चर्चेत होतं की, त्यावर अखेर विकीला सांगावं लागलं असं काहीही झालेलं नाही. लवकरच आपल्याला तारीख कळवेल. आणि आता त्यानं सांगितल्यानुसार त्यांच्या साखरपूड्याची माहिती त्यानं दिली आहे.

सुरुवातीला विकी कौशल आणि कॅटरिना यांच्यातील प्रेमप्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. त्यावरुन सलमान खानलाही ट्रोल व्हावे लागले होते. काही काळ विकीकडे चित्रपट नव्हते याचे कारणही सलमान खान असल्याचे सांगण्यात आले. सध्या विकीनं मनातील गोष्ट जाहीर केल्यानं चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. लवकरच साखरपूडा करणार असल्याचे त्यानं सांगितलं आहे. विक्की आणि कॅटरिना हे दोघेही त्यांच्या रिलेशनशिपवरुन चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून असे सांगितले जात होते की, ते एकमेकांना डेट करत आहे.

एकीकडे विकी कौशल त्याच्या सरदार उधम सिंगच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना त्यानं दुसरीकडे त्याच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं आहे. ज्यामुळे चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी आपण साखरपूडा केला अशा ज्या बातम्या आल्या त्या अफवा होत्या. असं त्यानं यावेळी सांगितलं. मात्र मी आता लवकरच साखरपूडा करणार असल्याचे त्यानं सांगितलं आहे. त्याची वेळ येणार आहे. यानंतर विकी आणि कॅटरिनावर कौतूकाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Ujani Water Storage: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा नदी कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा तातडीने पाणी सोडण्याचा आग्रह

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील संपूर्ण SIR रद्द झाली पाहिजे - राज ठाकरे

Coal India Bonus : कोल इंडिया कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; प्रत्येकाला १ लाख १० हजार २५० रुपयांचा बोनस

SCROLL FOR NEXT