Aditi Rao Hydari Birthday esakal
मनोरंजन

Aditi Rao Hydari Birthday: अवघ्या 17 व्या वर्षी प्रेमात अन् कमी वयातच घटस्फोट, आदितीची लव्हस्टोरी…

वयाच्या 21 व्या वर्षी सत्यदीपशी केलं लग्न...

सकाळ डिजिटल टीम

मोजक्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सुंदर आणि तितकीच अप्रतिम अभिनेत्री अदिती राव हैदरी आज तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. पद्मावत, रॉकस्टार, वजीर आणि इतर अनेक चित्रपटांमधील भूमिकांमधुन तिने तिची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

मात्र ती तिच्या अभिनय क्षेत्रात जितकी यशस्वी ठरली तितकीच ती तिच्या खासगीआयूष्यात ठरु शकली नाही. अदिती बहुतेक वेळा लाइमलाइटपासून लांबच राहते. ती उघडपणे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळतं असतं. अनेकांना याबाबत माहित नाही कि तिने वयाच्या २१ व्या वर्षी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले होते.

तिच्या आधीच्या एका मुलाखतीदरम्यान, आदितीने अभिनेता सत्यदीप मिश्रासोबतच्या तिच्या लग्नाबद्दल उघडपणे सांगितले की जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा तिला खुप धक्का बसला होता. ती मनातुन खचली होती. तिचे हृदय तुटले होते.

एका मुलाखतीदरम्यान तिने खुलासा केला होता की, 'ती १७ वर्षांची असताना सत्यदीपच्या प्रेमात पडली होती आणि ते तिचे सिरीअस रिलेशन होते. मी 21 व्या वर्षी सत्यदीपशी लग्न केले,  तो एक सरकारी कर्मचारी आणि वकील होता आणि त्याने अभिनेता होण्यासाठी मला सोडलं.’

'आम्ही वेगळे झालो तेव्हा माझे हृदय तुटले, आमच्या नात्याचे नावच तुटले आहे पण आम्ही चांगले मित्र आहोत आणि अजूनही एकमेकांच्या जवळ आहोत. त्याच्या आईसाठी मी नेहमी तिची मुलगी आहे आणि माझ्या आईसाठी सत्यदीप नेहमीच मुलगाच राहील. तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे आणि मला त्याची मूलगी असण्याबद्दल नेहमी चिडवलं जात ज्यापासून कधीही त्याची सुटका होउ शकत नाही. योगायोगाने, मर्डर 3 एका मुलीबद्दल होता ज्याचा मी माझ्या स्वतःच्या आयुष्याशी संबंध ठेवू शकते.' असा गंभीर आरोपही तिने सत्यदिपवर केला होता.

यापुढे ती बोलतांना म्हणाली की,'मी यापूर्वी याबद्दल बोलले नाही आणि आताही मला याबद्दल बोलायचे नाही याचे एक कारण आहे. मला वाटत नाही की मी कोणत्या कुटुंबातून आले आहे किंवा मी कुठे मोठी झाले आहे. वैयक्तिक गोष्टींवर चर्चा करणं, हे कलाकार म्हणून मला महत्त्वाचं वाटतं नाही. आपण पारदर्शक असले पाहिजे आणि आपल्याला जे काही दिले जाईल ते स्वीकारले पाहिजे आणि आपल्या खाजगी जीवनाबद्दल उघडपणे बोलण्याची गरज नाही.' असं स्पष्टीकरणंही तिने दिलं. थोडक्यात हेच की तिला तिच्या खासगी आयूष्याबद्दल बोलण्यात रस नाही.

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ याला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, दोघांनीही या नात्याबद्दल स्पष्ट केलेले नाही  किंवा अफवांना होकारही दिलेला नाही मात्र त्यांनी त्या नाकारलेल्याही नाहित.

आदिती राव हैदरी हिने 2006 मध्ये आलेल्या ‘प्रजापती’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तर ती शेवटी दुल्कर सलमान आणि काजल अग्रवाल यांच्यासह ‘हे! सिनामिका’ मध्ये दिसली होती. ती सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे तसेच ती तामिळ चित्रपट ‘गांधी टॉक्स’ आणि आगामी वेब सिरीज ‘ज्युबिली’ मध्ये देखील दिसणार आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT