Aishwarya Rai Bachchan esakal
मनोरंजन

Ponniyin Selvan 1: ऐश्वर्या रॉय मालामाल, केली कोट्यवधींची कमाई

बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai Bachchan) ही सध्या चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Entertainment News: बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai Bachchan) ही सध्या चर्चेत आली आहे. ते तिच्या आगामी चित्रपटामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेली ऐश्वर्या साऊथच्या एका चित्रपटामधून पुन्हा चाहत्यांसमोर येणार आहे. तिच्या त्या चित्रपटाची प्रचंड प्रमाणात उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. पोनियम सेल्वन नावाच्या चित्रपटातून (Bollywood Movie) ती झळकणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ऐश्वर्यानं कोट्यवधी रूपये कमावले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम (Mani ratnam) यांच्या पॅन इंडिया अंतर्गत या चित्रपटातील ऐश्वर्यांच्या लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

दहाव्या शतकातील एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. पिरियड ड्रामा प्रकारातील या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट लांबणीवर पडला होता. ऐश्वर्याचा आतापर्यतचा सर्वाधिक महागडा चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे ओटीटी हक्क अॅमेझॉननं विकत घेतले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तब्बल 125 कोटी रुपये या चित्रपटाला मिळाले आहेत. भलेही हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत असला तरी जेव्हा तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल तेव्हा त्यानं मोठी कमाई अगोदरच करुन ठेवली आहे.

Aishwarya Rai new movie

पोनियन सेल्वन 1 (Ponniyin Selvan-1) याचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. यापूर्वी मणिरत्नम यांच्या गुरु आणि रावण चित्रपटातून ऐश्वर्यानं भूमिका केल्या आहेत. एका तमिळ कादंबरीवर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक कल्कि यांनी 1995 मध्ये ही कादंबरी लिहिली होती. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला होता. त्यानंतर या चित्रपटातील विक्रम, जयम रवि, शोभिता यांचे लूकही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाची घरे खरंच परवडणारी? मुंबईतील घरांच्या किमती एक काेटीच्या पुढे

Lightning Strike Death : साताऱ्यात अवकाळीचे तांडव! वीज अंगावर कोसळून महिला ठार; वाई-खंडाळ्यात 35 निष्पाप मुक्या जीवांचा अंत

Fuel Shortage Rumor : युद्धाच्या अफवेने 'इंधन' भडकलं! मुक्ताईनगरमध्ये 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्यांत भरलं जातंय पेट्रोल-डिझेल; पाहा धक्कादायक Video

Pune News: पुणे ‘आरटीओ’त लाचखोरीचा ‘कळस’; वाहननिरीक्षकाची तक्रार, पदोन्नतीला ‘ब्रेक’ची शक्यता, त्या’ बड्या धेंडांवर कारवाई होणार का?

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात दिवसभर कूल, फ्रेश आणि सुपर स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT