Aishwarya Rai
Aishwarya Rai 
मनोरंजन

Aishwarya Rai Good News: मणिरत्नम यांच्या 'PS1' मधून कमबॅक

युगंधर ताजणे

Aishwarya Rai: विश्वसुंदरी आणि बॉलीवूडची स्टार अभिनेत्री ऐश्वर्या रॉय - बच्चन हिच्या चाहत्यांसाठी खूश खबर आहे. ती म्हणजे ऐश्वर्या (Entertainment News) मोठ्या काळानंतर पुन्हा चित्रपटात झळकणार (Bollywood News) आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ ती बॉलीवूडपासून लांब होती. आता तिनं प्रख्यात दिग्दर्शक मणिरत्नम (Bollywood Movies)यांच्या एका चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. ऐश्वर्यानं चाहत्यांनी ही गोड बातमी दिली आहे. मणिरत्नम (Entertainment) दिग्दर्शित करत असलेल्या पीएस 1 चित्रपटामध्ये ऐश्वर्या झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या या चित्रपटाची चर्चा होती. मायथोलॉजिकल जॉनरची ही फिल्म असणार आहे. आता सोशल मीडियावर पीएस1 चा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे.

पीएस 1 हा मणिरत्न यांचा एक महत्वाकांक्षी चित्रपट आहे. तो दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तो कल्कि यांच्या क्लासिकल नोव्हेल पोन्नियन सेल्वनवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती लाईका प्रॉडक्शन आणि मद्रास टॉकिजनं केलं आहे. यावर्षी 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पीएस 1 ची कथा ही दहाव्या शतकातील प्रमुख राजवंश चोल साम्राज्याशी संबंधित आहे. त्याच्या कालखंडातील काही ठळक घडामोडी या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. राजघराण्यातील संघर्ष, वाद, सत्तांतर यावर यानिमित्तानं पडद्यावर साकारण्यात आलं आहे. चित्रपटात ऐश्वर्या रॉय, विक्रम, जयम रवि, कीर्ती आणि शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पीएस 1 ही एक पॅन इंडिया चित्रपट असून जो तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून ऐश्वर्या चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिचा शेवटचा चित्रपट फन्ने खा होता. जो 2018 मध्ये आला होता. त्यात ऐश्वर्या रॉय सोबत राजकुमार राव आणि अनिल कपूर हे कलाकार होते. गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या ही तिच्या चित्रपटांसाठी जास्त गंभीर झाली आहे. तिनं चित्रपटांची निवड करताना विशेष काळजी देखील घेतली आहे. फन्ने खा पूर्वी ऐश्वर्या ही 2016 मध्ये दोनच बॉलीवूडपटांमध्ये दिसून आली होती. त्यात सरबजित सिंग आणि ये दिल है मुश्किल यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT