Actor Ranbir Kapoor is dating Alia Bhatt Team esakal
मनोरंजन

रणबीर समोरच आलियाला विचारलं लग्न कधी?: तिनं दिलं उत्तर

विकी (vikcy kaushal) आणि कतरिनाचे (katrina kaif) लग्न झाल्यानंतर आता रणबीर कपूर - आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - विकी (vikcy kaushal) आणि कतरिनाचे (katrina kaif) लग्न झाल्यानंतर आता रणबीर कपूर - आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. राजस्थानातील एका बड्या हॉटेलमध्ये विकी कतरिनाचे लग्न झाले. त्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. नियम आणि अटींचे पालन करत मोठ्या उत्साहात पार पडलेल्या विकी कतरिनाच्या लग्नाची अजून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. काल ही जोडी मुंबईत दाखल झाली. तेव्हाचेही फोटो चाहत्यांनी पाहिले. त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान चाहत्यांनी आता आपला मोर्चा रणबीर आणि आलियाच्या लग्नाकडे वळवला आहे. एका कार्यक्रमामध्ये तर आलियाचा रणबीर (Ranbir Kapoor) समोरच लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. (Ranbir Kapoor Asks Alia Bhatt Hamari Shaadi Kab Hogi)

गेल्या काही महिन्यांपासून आलिया (Alia Bhatt) रणबीरच्या (Ranbir kapoor) लग्नाची चर्चा सुरु आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी लग्न केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावर रणबीरनं आपण लग्न केलं असं चाहत्यांनी समजायला हरकत नाही. अशी गंमतीत एक प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता विकी कतरिनाच्या लग्नानंतर रणबीर आलियाला चाहत्यांनी लग्नाचा प्रश्न विचारुन हैराण केल्याचे दिसून येत आहे. आलिया आणि रणबीर हे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे ते लवकरच विवाहबद्ध होतील. अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. मात्र त्यांच्या लग्नाची तारीख केव्हा ठरणार याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

14 डिसेंबरला ब्रम्हास्त्रच्या (Brahmastra) पोस्टर रिलिजचा एक कार्यक्रम पार पडला. त्यावेळी उपस्थित असलेल्या चाहत्यांनी तिला रणबीर समोरच लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. त्यावेळी तिनं दिलेलं उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेणारे होते. त्यावर आलियानं सांगितलं की, आलियानं त्या प्रश्नाचे उत्तर देताना रणबीरकडे पाहिलं. आणि म्हणाली, सध्या रणबीरच्या ब्रम्हास्त्रचे प्रमोशन सुरु आहे. त्याच्या या चित्रपटाची आपल्या सर्वांना उत्सुकता देखील आहे. ते झाल्यानंतर आपण या प्रस्तावाचा विचार करणार आहे. तर रणबीरनं आता विकी कतरिनाचे लग्न झाले. आमचे कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर त्यानं हा प्रश्न पुन्हा आलियाला आणि अयानला विचारला. यावेळी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT