Amisha patel esakal
मनोरंजन

काय सांगता, अमिषाला मिळालं शांततेचं नोबेल!

अमिषा पटेल (Amisha patel) ही सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे त्याचे कारणही भन्नाट आहे.

युगंधर ताजणे

Bollywood News: अमिषा पटेल (Amisha patel) ही सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे त्याचे कारणही भन्नाट आहे. तिला चक्क नोबेल पुरस्कार जाहिर झाला आहे. आणि तिनं तो बॉलीवूडचे प्रसिद्ध खलनायक गुलशन ग्रोव्हर (Bollywood Actor Gulshan Grover) यांच्या हस्ते स्विकारला देखील आहे. गेल्या काही दिवसांपासून अमिषा चर्चेत आली आहे. मध्यप्रदेशातील एका घटनेमुळे तिला (Bollywood News) मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले होते. एका तासाचे चार लाख घेऊन तीन मिनिटांमध्येच त्या धार्मिक कार्यक्रमातून (entertainment news) पळ काढणाऱ्या अमिषावर गुन्हाही दाखल कऱण्यात आला होता. त्यावर तिनं आपल्या सुरक्षेचे कारण पुढे करत सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला होता.

आता अमिषाची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्याला कारण तिला मिळालेलं नेल्सन मंडेला पीस अॅवॉर्ड 2022. यामुळे अमिषावर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबईतील एका ठिकाणी नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार सोहळा पार पडला. त्या कार्यक्रमाला बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते गुलशन ग्रोव्हर, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित होते. याप्रसंगी खासदार रामदास आठवले यांना देखील या पुरस्कारानं गौरविण्यात आले. अमिषाला पुरस्कार मिळताच तिच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले. अनेकांनी तिला ट्रोलही केले. अमिषाला एवढ्या व्यक्तीच्या नावानं पुरस्कार म्हणजे आता आपण काय बोलायचे, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या आहेत.

राकेश रोशन दिग्दर्शित कहो ना प्यार है या चित्रपटातून अमिषानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर काही चित्रपटांमध्येही अमिषानं अभिनय केला. मात्र प्रेक्षकांना तिचा अभिनय फारसा प्रभावी वाटला नाही. त्यामुळे तिचा बॉलीवूडमधील प्रवास थंडावला. आगामी काळात ती काही ओटीटी मालिकांतून नेटकऱ्यांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL ची कॉपी करायला गेले अन् पाकडे तोंडावर आपटले; कवडी भावात विकली गेली PSL मधील हैदराबाद फ्रँचायझी, रिषभ-श्रेयस मिळून एवढे कमावतात...

BJP: भाजप नेत्याचा रहस्यमयी मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, कुटुंबाने दिली धक्कादायक माहिती

Fact Check : एलिसे पेरीने लाईव्ह सामन्यात बाबर आझमला केलं प्रपोज? BBL सामन्यात नेमकं काय घडलं?

'चला काहीतरी चांगलं पहायला मिळणार...' समरचा भूतकाळ स्वानंदीला कळणार! आजीला विश्वासात घेऊन स्वानंदी घरातल्यांचं सत्य समोर आणणार

Bank Loan EMI: दिलासादायक बातमी! गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयवर मोठी सवलत मिळणार; 'या' बँकेची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT