मनोरंजन

'83' पाहताच दीपिका रडली: दिग्दर्शकाला फोन करुन सांगितलं...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - कोरोनामुळे दोन वर्ष मनोरंजन (entertainment) क्षेत्राला मोठ्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागलं. यामध्ये अनेक प्रोजेक्ट जे प्रदर्शनासाठी तयार होते ते कोरोनामुळे रखडले होते. त्यामध्ये बहुचर्चित असा 83 (83 movie) देखील होती. भारतानं 1983 साली जिंकलेल्या वर्ल्ड कपची यशोगाथा (india won 83 world cup) हा या चित्रपटाचा महत्वाचा विषय आहे. त्यामध्ये रणवीर सिंगनं (ranveer singh) महत्वाची भूमिका साकारली आहे. कपिल देवची भूमिका त्यानं केली आहे. तर दीपिकानं कपिल देवच्या पत्नीच्या (deepika padukon) भूमिका वठवली आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्याच्या ट्रेलरला, गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर शो नुकताच पार पडला.

कबीर खान दिग्दर्शित (kabir khan) 83 ची सध्या हवा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. थिएटमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांची फौज मोठी आहे. नुकताच 83 चा (kapil dev) प्रीमिअर मुंबईतील एका थिएटरमध्ये पार पडला. त्यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार आणि सेलिब्रेटी उपस्थित होते. दीपिकानं जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा ती इमोशनल झाली. 83 च्या स्क्रिनिंगनंतर तिला रडू आलं आणि तिनं दिग्दर्शक कबीरला आपली प्रतिक्रिया कळवली. सध्या त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.

कबीर खाननं सांगितलं की, दीपिकाचा जेव्हा फोन आला तेव्हा ती कमालीची भावूक झाली होती. तिला काय बोलावं हे कळत नव्हतं. त्या चित्रपटानं ती भारावून गेली होती. मला सुरुवातीला वाटतं तिनं चुकून फोन केला असेल मात्र तसं नव्हतं. दीपिकाच्या तोंडून शब्दच येत नव्हते. ती म्हणाली मला माफ कर... मला 83 पाहिल्यावर काय बोलावं हे कळेनासं झालं आहे. यावर मी तिला म्हणालो, यापेक्षा तु अधिक काही बोलू नको. तुला जे काही म्हणायचं आहे ते मला कळलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT