मनोरंजन

'अभिनेत्यांनी शर्ट काढलं तर चालतं, मग...'; टॉपलेस फोटोनं ईशा ट्रोल

बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या या अभिनेत्रीचं एक फोटोशुट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. तिच्या त्या फोटोशुटला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. सध्या तिच्या त्या हॉट फोटोशुटनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ते फोटो शेयर करताना तिनं त्याला काही कॅप्शनही दिले आहेत. त्याची चर्चा आहे. त्यामध्ये तिनं जेंडर बायस या विषयाकडे लक्ष वेधले आहे. बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यात अनेकदा केला जाणारा फरकही तिनं आपल्या त्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला आहे.

ईशानं त्या फोटोंना कॅप्शन देताना असं म्हटलं आहे की, जर एखाद्या अभिनेत्यांन शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेयर केला तर त्याला मिळणारा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया सर्वांना माहिती आहे. मात्र तशाच प्रकारचे फोटो जर एखाद्या अभिनेत्रींनं शेयर केले की तिला ट्रोल केले जाते. असे का असा प्रश्न ईशानं चाहत्यांना विचारला आहे. त्यावरुन तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही आल्या आहेत. तिला कित्येकांनी ट्रोलही केले आहे. हे अशाप्रकारचा भेदभाव म्हणजे जेंडर बायस आहे. अशी खंतही सोमी अलीनं व्यक्त केली आहे.

या प्रकरणाबाबत तिनं हिंदूस्थान टाईम्ससोबत संवाद साधला आहे. त्यामध्ये तिनं म्हटलं आहे की, जेव्हा एखादा अभिनेता त्याचा शर्टलेस फोटो शेयर करतो तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा असतो त्याला ट्रोल केले जात नाही. मात्र एखादी अभिनेत्री जेव्हा तिचा टॉपलेस फोटो शेयर करते तेव्हा तिला मात्र ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. अभिनेत्याला साधारण मिळणारी कमेंट अशी की, वा क्या बात है, काय सुंदर बॉडी आहे. एकदम भन्नाट लूक असे म्हटले जाते. तर अभिनेत्रीचं कॅरेक्टर लुझ आहे अशाप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. असं ईशानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT