bollywood actress jacquelin fernandez
bollywood actress jacquelin fernandez 
मनोरंजन

मनी माफियानं जॅकलीनच्या बहिणींना दिली मर्सिडिझ, पैशांची केली मदत

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ (bollywood actress jacquelin fernandez) आता चांगलीच अडचणीत आली आहे. तिचा मनी लाँड्रिंग प्रकरणातील प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखर सोबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुकेशनं बॉलीवूडमधील (sukesh chandrashekhar) काही अभिनेत्रींना आपल्या जाळ्यात ओढल्याचे दिसून आले आहे. त्यात नोरा फतेही (Nora fatehi) आणि जॅकलीनचं नाव समोर आलं होतं. त्यानं नोरा आणि जॅकलीनला कोट्यवधी रुपयांचे गिफ्टस दिले होते. एनसीबीनं केलेल्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यामध्ये केवळ जॅकलीन नाहीतर तिच्या कुटूंबियांना देखील सुकेशनं महागड्या वस्तू दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (sueksh chandrashekhar gifts jacquelin sisters)

अल्पवधीतच जॅकलीननं आपल्या अभिनयानं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. मात्र तिचा काही मनीमाफियांशी संबंध असल्याची बाब उघडीस आली आहे. त्यापार्श्वभूमीवर तिला तपासासाठी देखील बोलविण्यात आले होते. तिच्यासह नोराला देखील ईडीनं नोटीस पाठवली होती. अजून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. जॅकलीन आणि सुकेशचे काही खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे जॅकलीनची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात तिला ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. दुसरीकडे जॅकलीनं चाहत्यांना आपली प्रायव्हसी जपण्याचे आवाहन केले आहे. तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुकेशनं केवळ जॅकलीनलाच नव्हे तर तिच्या कुटूंबियांना देखील कोट्यवधीचे गिफ्टस दिले होते. त्यामध्ये काही महागड्या गाड्यांचा देखील समावेश आहे. जॅकलीनच्या बहिणीला जैनीला त्यानं बीएमडब्ल्यु गिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्याची किंमत एक कोटी ८० लाख आहे. जॅकलीननं देखील आपल्या दुसऱ्या बहिणीला गेराल्डिनला एक लाख ५० हजार अमेकिन डॉलर उधार दिल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे जॅकलीनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. येत्या काळात जॅकलीनं आणि सुकेश यांच्यातील व्यवहाराच्या आणखी बातम्या समोर येण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT