Jhanvi Kapoor
Jhanvi Kapoor  
मनोरंजन

सुकेशमुळे जान्हवी गोत्यात?; काय घेतलं 18 लाखांचं गिफ्ट?

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Actress: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर आता (Bollywood News) एका वेगळ्या कारणावरुन चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचं आणि मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश (Sukesh Chandrashekhar) चंद्रशेखर सोबत तिचे नाव जोडले देले आहे. यामुळे गेल्या काही वेळेपासून जान्हवीवर (Jhanvi Kapoor) सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. 200 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सुकेश सध्या तिहार जेलमध्ये असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं देखील याप्रकरणात समोर आली होती. त्यामध्ये जॅकलीन फर्नांडिझचे नाव सर्वात चर्चेत आले होते. यासगळ्या प्रकरणावर जान्हवीनं प्रतिक्रियाही दिली आहे. Bollywood Actress Jhanvi Kapoor Sukesh Chandrashekhar gift money

नोरा फतेही आणि जॅकलीनला सुकेशनं काही महागडे गिफ्ट्स पाठवल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश आहे. ती अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. सुकेशच्या लिस्टमध्ये जान्हवी कपूर, सारा अली खान, भूमी पेड़णेकर यांच्याही नावाचा समावेश होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशनं या तीनही सेलिब्रेटींना महागड्या वस्तू पाठवल्या होत्या. यासोबतच सुकेशनं जान्हवीला 18 लाख रुपयांची भेटवस्तू पाठवली होती. त्यावर जान्हवीनं खुलासा केला आहे. त्यामध्ये तिनं आपल्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

जान्हवीच्या एका जवळच्या मित्रानं मीडियाला माहिती देताना सांगितलं की, जान्हवीचा आणि सुकेशचा थेट संबंध नव्हता. ती कधीही त्याला भेटली नाही. जान्हवीचा आणि सुकेशचा संबंध हा त्याच्या मॅनेजरमुळे आला होता. सध्या जान्हवीच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे जान्हवीवर सोशल मीडियातून टीका होत आहे. मात्र त्यात काही तथ्य नाही. नेल आर्ट स्टूडिओमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जान्हवी बंगळुरुला गेली होती. त्यावेळी तिथं तिची सुकेश सोबत ओळख झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT