bollywood actress juhi chawla angry with aamir khan Google
मनोरंजन

Aamir Khan: 'सिनेमाच्या सेटवर सर्वांसमोर...', त्यावेळी जुहीसोबत आमिर चुकीचच वागला

आमिर खान आणि जुही चावला यांनी एकत्र अनेक सिनेमे केले, त्यापैकी बरेच सुपरहिट ठरले पण त्या वादानंतर दोघांनी काही वर्ष एकमेकांचे तोंडही पाहिले नाही.

प्रणाली मोरे

Aamir Khan: बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि अजय देवगण दोन्ही अभिनेते आपल्या सहकलाकारांची भरपूर मजा-मस्करी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्हाला कदाचित १९९७ साली प्रदर्शित झालेला 'इश्क' सिनेमा आठवत असेल,ज्यात जुही चावला,आमिर खान,अजय देवगण आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका होत्या. एके दिवशी शूटिंगच्या दरम्यान जुही चावलाचे काही खास लोक शूटिंग पाहण्यासाठी आले होते. (bollywood actress juhi chawla angry with aamir khan)

जुहीच्या त्या पाहुण्यांसमोर अजय आणि आमिर खाननं तिची मस्करी करण्यास सुरुवात केली, अर्थात आमिर आणि अजय असं अनेकदा करायचे पण त्या दिवशी सेटवर खूप जणं उपस्थित होते, आणि अजयपेक्षा आमिरनं खूप वाईट पद्धतीनं जुहीची खिल्ली उडवली. ज्यामुळे आपला अपमान जुही सहन करू शकली नाही. त्या दिवशी आमिरनं केलेली मस्करी जुहीला इतकी मनाला टोचली की दुसऱ्या दिवशी ती शूटिंगला आलीच नाही. त्यामुळे शूटिंग कॅन्सल करावं लागलं,पण या गोष्टीनं आमिर चिंतेत पडला कारण त्याला वाटलं माझ्या एका मस्करीमुळे सगळ्या युनिटला त्रास झाला.

अर्थात,त्यानंतर निर्माता-दिग्दर्शकाने जुहीशी बातचीत करून तिला शूटिंगसाठी मनवलं आणि शूटिंग पुन्हा सुरू केले. त्या दिवसानंतर आमिर खाननं कधीच जुही चावलाची मस्करी केली नाही. आणि त्यानंतर म्हणे ६ ते ७ वर्ष आमिर आणि जुही बोलतही नव्हते. हा किस्सा आमिरनं स्वतः एका मुलाखतीत सांगितला आहे. आपल्या माहितीसाठी थोडक्यात इथे सांगतो की आमिर आणि जुहीनं एकत्र 'कयामत से कयामत तक', 'इश्क','हम है राही प्यार के','तुम मेरे हो' आणि 'लव लव लव' सारखे सिनेमे एकत्र केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT