bollywood actress kajol kiara advani sushmita sen hema malini at North Bombay Sarbojanin Durga Puja  SAKAL
मनोरंजन

Sushmita Sen: 'दांडिया रंग मा आयो!', सुष्मिता सेन मुलीसोबत दुर्गापुजेत थिरकली, बॉलिवूड अभिनेत्री देवीच्या दर्शनाला

सुष्मिता सेन मुलीसोबत दुर्गापुजेत थिरकलीय, व्हिडीओ बघाच

Devendra Jadhav

गेल्या काही दिवसांपासुन सुष्मिता सेन चांगलीच चर्चेत आहे. सुष्मिता सेनची भुमिका असलेली ताली वेबसिरीज चांगली लोकप्रिय झाली. गौरी सावंत यांची भुमिका साकारुन सुष्मिताने जाणकार आणि लोकांचं मन जिंकलं.

सुष्मिता लवकरच आर्या वेबसिरीजच्या नवीन सीझनमधून भेटीला येणार आहे. अशातच सुष्मिताचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. यात ती तिच्या मुलीसोबत दुर्गा पुजेत सहभागी झाली. सुष्मिता सोबतच अभिनेत्री कियारा अडवाणी, जॅकलीन फर्नांडीस, राणी मुखर्जी अशा अभिनेत्री सुद्धा दुर्गापुजेत सहभागी होत्या.

(bollywood actress kajol kiara advani sushmita sen hema malini at North Bombay Sarbojanin Durga Puja)

सुष्मिता सेम मुलीसोबत थिरकली

सुष्मिता सेन शनिवारी रात्री दुर्गापूजेसाठी बाहेर पडली. यावेळी तिच्या मुली रेनी आणि अलिसा सुद्धा तिच्यासोबत होत्या. इतकेच नाही तर सुष्मिताने पंडालमध्ये धुनुची नृत्यही केले.

तिच्यासोबत मुलगी रेनीही सामील झाली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. सुष्मिता सेन गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. सुष्मिता आणि तिच्या मुलींच्या डान्सला लोकांनी चांगलीच पसंती दिली.

कियारा अडवाणी - राणी मुखर्जी दुर्गापुजेला एकत्र

याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी - राणी मुखर्जी नवरात्रीच्या दुर्गापुजेला एकत्र आल्या. कियारा आणि राणी मुखर्जीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. कियारा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तर राणी मुखर्जी क्रिम कलरच्या साडीत देवीचं दर्शन घ्यायला आली होती.

हेमा मालिनी मुलीसोबत, काजोल सुद्धा दुर्गापुजेला

हेमा मालिनी रेशमी कांजीवरम साडीत शोभून दुर्गा पुजेला उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी ईशा देओल हाफ-स्लीव्ह सिक्विन ब्लाउजसह क्रीम ड्रेस परिधान करुन आली होती.

याशिवाय गुलाबी रंगाच्या साडीत काजोल दुर्गापुजेला आली होती. तसंच बंटी और बबली फेम शर्वरी वाघ सुद्धा देवीच्या पाया पडायाला उपस्थित होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी

Nashik Municipal Election : सिडकोत निकालाचा थरार! भाजपचे दुबार एबी फॉर्म प्रकरण गाजले; ५ जणांची उमेदवारी फेटाळली

Car Launch in 2026 : एकच झलक, सबसे अलग! 2026 वर्षांत लॉंच होणार 10 ब्रॅंड कार; परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स

SCROLL FOR NEXT