kareena and kangana  Team esakal
मनोरंजन

सीतेच्या भूमिकेत कंगना, करिनाचा पत्ता कट ?

कंगना राणावत (kangana ranaut)सीतेची भूमिका करणार असल्याची चर्चा आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) रामायणावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तो चित्रपट सीतेच्या व्यक्तिरेखेवर केंद्रित असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सीतेच्या (ramayana sita) भूमिकेबाबत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होताना दिसतेय. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (bollywood actress kareena kapoor) ही भूमिका करणार अशी चर्चा होती. जेव्हा ती बातमी सगळीकडं पसरली तेव्हा त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. आता ती भूमिका बॉलीवूडमधील दुसरी अभिनेत्री करणार आहे. तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा विचार होतो आहे. यासंबंधी त्या चित्रपटाचे लेखक यांनी माहिती दिली आहे. (bollywood actress kangana ranaut displace kareena kapoor form sita)

त्याचं काय आहे, सीतेची भूमिका करण्यासाठी करिनानं बारा कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर करिनाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली होती. आता या चित्रपटाच्या बाबत आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे करिनाचा सीतेच्या भूमिकेसाठी विचार होणार नाही. तिची जागा बॉलीवूडच्या दुस-या अभिनेत्रीनं घेतली आहे.

कंगना राणावत (kangana ranaut)सीतेची भूमिका करणार असल्याची चर्चा आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. आता माहिती अशी आहे की, या चित्रपटाच्या निर्मात्यांना कंगना राणावतला कास्ट करायचे होते. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सीता द इनकार्नेशन च्या निर्मात्यांनी कंगनाला या चित्रपटात घेण्याचा विचार केला आहे. चित्रपटाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसादनं कंगनाला चित्रपटात घेण्याचा विचार केला आहे. त्यानंतर आता अशी चर्चा आहे की, करिनाची जागा कंगना घेणार आहे. मात्र निर्मात्यांनी या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीता द इनकार्नेशनसाठी अजूनही करिनाचे नाव चर्चेत आहे. मात्र मेकर्सन अद्याप करिनाशी देखील संपर्क साधलेला नाही. केवी विजयेंद्र यांना असे वाटते, नव्या भूमिकेसाठी कंगना ही परफेक्ट अभिनेत्री आहे. मात्र त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या विजयेंद्र आरआरआर मध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस एस राजमौली हे करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT