actress kangana ranaut  Team esakal
मनोरंजन

कंगना हाजीर हो! वेळ नाही म्हणून केली टाळाटाळ

सतत वेगवेगळ्या प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करुन लक्ष वेधून घेणाऱ्या कंगनाचा (kangana ranaut) परिचय कुणालाही नवीन नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सतत वेगवेगळ्या प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करुन लक्ष वेधून घेणाऱ्या कंगनाचा (kangana ranaut) परिचय कुणालाही नवीन नाही. ती आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखली जाते. आपण जे काही बोलतो त्याचे परिणाम तिला माहिती असून देखील धाडसानं ती बेताल वक्तव्यं करते यामुळे तिनं अनेकदा कित्येकांची नाराजीही ओढावून घेतली आहे. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं चौकशीला सामोरं जाण्यास केलेली टाळाटाळ. याचा फटका तिला बसला आहे. संबंधित न्याय प्रशासनानं तिला चौकशीला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कंगनाची अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी कंगनानं केलेल्या बेताल वक्तव्यामुळे तिच्या विरुद्ध एफआयआर मुंबईतील एका पोलीस (mumbai police) स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यासंबंधीची फिर्याद दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अमरजित सिंग संधू यांनी दिली होती. त्यांच्यासह शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनीही तक्रार दिली होती. तक्रारकर्त्यांनी कंगनावर आंदोलक शेतकर्‍यांना खलिस्तानी दहशतवादी म्हटल्याचा आरोप त्या तक्रारीत केला होता. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. यासंबंधी मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र कंगनाला त्यानंतर पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली. त्यामध्ये तिला हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.

याप्रकरणी कंगनाच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितलं की, कंगना तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच ती मुंबईबाहेर आहे. अशा परिस्थितीमध्ये खार पोलीस ठाण्यात त्यांचे म्हणणे नोंदवण्याकरिता त्यांना थोडा वेळ लागेल. तो आम्हाला मिळावा. अशी मागणी केली आहे. कंगना पुन्हा मुंबईत आल्यानंतर चौकशीला सामोरं जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आज कंगनाला खार पोलिस स्टेशनमध्ये तिची बाजु मांडण्यासाठी बोलवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

Asian Games : भारतीय क्रिकेटपटूच्या घराबाहेर पोहोचली तरुणी; खेळाडू श्रेयससोबत जपानमध्ये, तिचा इथे ड्रामा, नेमकं काय घडलं?

पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT