Javed Akhtar and Kangana Ranaut instagram
मनोरंजन

कंगनाची याचिका कोर्टानं धुडकावली, काय होतं कारण?

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतला तिच्या वादग्रस्त भूमिकेसाठी ओळखली जाते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतला तिच्या वादग्रस्त भूमिकेसाठी ओळखली जाते. तिनं यापूर्वी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याची नेहमीच चर्चा होत असते. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्यावर केलेल्या वक्तव्यानं तिला कोर्टाची पायरी चढावी लागली होती. यावेळी जावेद अख्तर यांनी देखील कंगनाला धडा शिकवायचाच अशा हेतूनं तयारी केल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यावर कोर्टानं आता कंगनाची एक याचिका रद्द केली आहे. त्यामुळे तिला मोठा झटका बसला आहे. गेल्या वर्षभरापासून कंगनानं वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

कंगनानं इतकी बेताल वक्तव्य केली आहेत की, व्टिटरनं तिचं अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असा प्रकार यापूर्वी देखील तिच्याबाबत झाला आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींवर कंगनानं टोकाची वक्तव्ये केली आहेत. काही महिन्यांपूर्वी तिनं देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर वक्तव्ये केलं होतं. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. बॉलीवूडमधील अनेकांनी तिच्या या बोलण्याचा निषेध केला होता. कित्येक ठिकाणी तिच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. आताही ती चर्चेत आली आहे ते कोर्टानं तिच्या रद्द केलेल्या याचिकेवरुन.

कंगनानं सत्र न्यायालयामध्ये केलेल्या याचिकेमध्ये अख्तर यांच्यावर आरोप केले होते. त्यामध्ये कंगनानं आपल्या वकीलामार्फत ती केस दुसऱ्या कोर्टामध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. पूर्वी केलेल्या कोर्टातील याचिकेवर आपल्याला समाधानकारक निर्णय मिळाला नसल्याची तक्रार कंगनानं केली होती. अख्तर यांच्यावर जो मानहानीचा दावा दाखल करण्याची याचिका कंगनानं वरिष्ठ कोर्टामध्ये केली ती कोर्टानं फेटाळल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT