kangana ranaut 
मनोरंजन

थलाइवीचा लुक रिलीज; कंगनाने वाढवले तब्बल 20 किलो वजन!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बोल्ड वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहणारी हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. कंगना नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. मग ते सरकार विरोधी वक्तव्य असो वा बॅालिवूडमधील कलाकरांवरील टीका, कंगना बिनधास्त तिची मतं सोशल मीडियावर शेअर करते. ट्विटरच्या माध्यमातून कंगना आपली मत लोकांपर्यंत पोहचवते. अनेक वेळा तिच्या ट्विटमुळे तिला ट्रोल केले जाते. नुकताच कंगनाने तिचा चित्रपट थलाइवीमधील लूक ट्विटरवर शेअर केला आहे.

कंगनाचा थलाइवी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्चला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जिवनावर आधारित आहे. कंगनाने या चित्रपटातील तिच्या 3 वेगवेगळ्या लुकचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला. या चित्रपटामधून  कंगना जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी हा प्रवास प्रेक्षकांना  तिच्या अभिनयामधून दाखवणार आहे.

कंगनाच्या या लुकमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटातील लूकचा फोटो शेअर करून कंगनाने कॅप्शन दिले,'थलाइवीचा ट्रेलर रिलीज उद्या होणार आहे. या चित्रपटासाठी मी 20 वजन वाढवले. त्यानंतर काही महिन्यांनी तेवढेच वजन कमी करावे लागले. हे चॅलेंज मला या महान बायोपिकसाठी घ्यावे लागले.'

थलाइवी चित्रपटाचे दिग्दर्शन ए. एल. विजय यांनी केले आहे. कंगनासोबत या चित्रपटात भाग्यश्री,अरविंद स्वामी,समीरा रेड्डी, प्रकाश राज, अषतोश राणा हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. थलाइवीसोबतच कंगनाचे अनेक चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. 'धाकड'. हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगनाने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT