kangana ranaut
kangana ranaut 
मनोरंजन

'माझं हृदय तुटलं', कंगनाने शेअर केले घराचे Before - After फोटो

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असते. तिची मतं, वक्तव्य तसेच तिच्या आयुष्यातील खास क्षण ती सोशल मीडियावर प्रेक्षकांसोबत शेअर करते. बीएमसीने सप्टेंबर 2020 मध्ये कंगनाचे मुंबईमधील 'मणिकर्णिका' हे ऑफिस तोडले होते. त्यानंतर 6 महिन्यांनी कंगना ऑफिसला भेट दिली. ऑफिसची पाहणी करत असलेले फोटो आणि ऑफिस तोडायच्या आधीचे फोटो कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटोमध्ये 6 महिन्यांपूर्वी सजवलेले आणि लक्झरी असलेले ऑफिस दिसत आहे. त्यानंतर तोडलेल्या ऑफिसचे फोटो आहेत. 

कंगनाने ट्विट करून ऑफिसचे झालेलं नुकसान दाखवलं. फोटो शेअर करत कंगना म्हणाली,'माझ्या मिटींग मी घरी करत आहे. अक्षत राणावतने मणिकर्णिका फिल्म्सची स्थापना माझ्यासोबत केली. अक्षत माझ्यावर असलेल्या 700 केस एक हाती सांभाळत आहे. आज त्यानेच मला मिटींगसाठी ऑफिसवर बोलवले. ऑफिसला अशा अवस्थेत पाहण्याची माझी इच्छा नव्हती. हे पाहून पुन्हा माझं हृदय तुटलं.'

कंगनाचे ऑफिस 9 सप्टेंबर रोजी 2020 मध्ये बीएमसी तोडले. हे ऑफिस अनधिकृत असल्याचे सांगत कारवाई करण्यात आली होती. तेव्हा कंगनाने हायकोर्टत धाव घेतली होती. बीएमसीने केलेली कारवाई ही चांगल्या हेतूने नव्हती असे उच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये म्हटलं होतं. तसंच बीएमसीने अभिनेत्रीच्या घराची तोडफोड केली या प्रकरणी तिला नुकसान भरपाई द्यावी असे न्यायालयाने म्हटलं होतं. कंगनाने 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती.

बीएमसीने ज्यावेळी कंगनाचे ऑफिस तोडले त्यावेळी कंगना म्हणाली,'डेमोक्रसीची हत्या झाली असून ज्यांनी माझं ऑफिस तोडलं ती बाबरची सेना आहे.' या ऑफिसाठी कंगनाने 48 कोटींची  गुंतवणूक केली होती. एका मुलाखतीत कंगनाने सांगितले की, तिच्या आई वडिलांनी एवढे महाग ऑफिस खरेदी करण्यासाठी नकार दिला होता.

दिवंगत मुख्यमंत्री जयललितांचा बयोपिक 'थलाइवी' मधून कंगना प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच कंगनाचे 'धाकड', 'मणिकर्णिका रिटर्न्सः द लीजेंड ऑफ दिद्दा' हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. इंदिरा गांधीच्या बायोपिकमध्ये देखील कंगना दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT