Katrina Kaif News esakal
मनोरंजन

Viral News: काय सांगता कतरिनाची गुड न्युज?, फोटोनं नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष

बॉलीवूडची अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) आणि विकी कौशलचं (Vicky Kaushal) लग्न गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालं.

सकाळ ऑनलाईन टीम

Bollywood News: बॉलीवूडची अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) आणि विकी कौशलचं (Vicky Kaushal) लग्न गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालं. राजस्थानातील एका बड्या अलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता. त्यावेळी (Bollywood Actress) बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. कतरिनाच्या लग्नानं तर साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. सगळ्या मीडियानं त्यांच्या लग्नाची दखल घेतली होती. कतरिना - विकीनं आपल्या लग्नाचे (Social media news) कोणतेही फोटो व्हायरल होणार नाही याची काळजी घेतली होती. त्या लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांसाठी वेगळी नियमावली तयार करण्यात आली होती. कतरिना आपल्या सासरी आल्यानंतर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी वेगवेगळ्या सणांचे फोटो व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या कतरिनाचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

कतरिनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, सलमानसोबत टायगर तीनमध्ये दिसणार आहे. कतरिना पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. आता कतरिनाचा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यामध्ये ती प्रेग्नंट असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. त्यामुळे कतरिनाला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. त्याप्रमाणे तिच्या चाहत्यांनी तिला आताच शुभेच्छाही देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कतरिना सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

एका लग्नसोहळ्यामध्ये कतरिनाला स्पॉट करण्यात आले होते. त्यावेळी तिचा जो फोटो समोर आला त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. काहींनी तर ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यासगळ्या अफवा असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याचं झालं असं की, कतरिनानं गुलाबी रंगाचा सैलसर ड्रेस परिधान केला होता. मात्र त्या फोटोमध्ये कतरिना प्रेग्नंट असल्याचा शोध काही नेटकऱ्यांनी लावला. आणि मोठ्या अफवांना ऊत आल्याचे दिसुन आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT