bollywood actress madhuri dixit waheeda rehman, Asha Parekh and Helen perform together on dance deewane 3 sets.jpg 
मनोरंजन

'ओल्ड इज गोल्ड' आशा, वहिदा, हेलन 'रॉक्स'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या आदाकारिने आणि नृत्याने ती नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकते. माधुरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील खास क्षण ती नेटकऱ्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करते.

नुकताच माधुरीने एक खास व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द आणि ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान, आशा पारेख आणि हेलन यांच्यासोबत डान्स करताना दिसली. प्रसिध्द टिव्ही शो 'डान्स दिवाने 3' मध्ये होळी स्पेशल भागात वहीदा रहमान, आशा पारेख आणि हेलन विशेष प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. यावेळी माधुरीला या अभिनेत्रींच्या आयकोनिक आणि सदाबाहार गाण्यांवर त्यांच्यासोबत नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. माधुरीने या अभिनेत्रींसोबत त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर डान्स केलेला व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला. 

एका व्हिडीओमध्ये माधुरीने अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्यासोबत तेरी कसम या चित्रपटातील हिट गाणे 'पान खाए सइयां हमारो' यावर डान्स केला. या व्हिडिओमध्ये माधुरी आणि वहिदा या दोघींची आदाकरी पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे.

वहिदांसोबतच माधुरीने अभिनेत्री आशा पारेख यांच्यासोबत 'अच्छा तो हम चलते है' या गाण्यावर डान्स केला. 1970 मध्ये रिलीज झालेल्या आन मिलो सजना या गाण्यातील आशा पारेख आणि राजेश खन्ना यांची जोडी त्यावेळी हिट ठरली होती. 

माधुरीने प्रसिध्द अभिनेत्री हेलन यांचे सुपर हिट गाणे 'मुंगळा' वर खास डान्स केला. यावेळी माधुरी आणि हेलनच्या हावभावाने नेटकऱ्यांचे मन जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT