Bollywood actress pooja bhatt says when i became star gender problem began in front of me 
मनोरंजन

'तुला मुलगी असल्यानं स्वभाव बदलावा लागेल, कळलं का?' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्टचं असं म्हणणं आहे की, तिच्या घरी नेहमीच सर्वांसाठी समानतेची वागणूक होती. कोणामध्येही भेदभाव केला जात नसे. सगळ्यांसाठी एकच गोष्ट. सर्वांना जे काही असेल ते सारखे दिले जात असे. त्यामुळे समानतेची वागणूक सर्वांमध्ये रुजली गेली आहे. पुरुष आणि स्री असा भेदभाव केला जात नव्हता. मात्र जेव्हा मी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा मला अनेक वेगळ्या प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे. त्याबद्दल फारसे कुणाला काही माहिती नाही. बॉलीवूडमध्ये अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले होते. मला तर त्याची काहीच कल्पना नव्हती.

एका मुलाखतीच्या दरम्यान पुजानं सांगितले होते की, मी फार सुदैवी आहे की मी अशा घरात जन्माला आले त्यात पहिल्यापासून कुठलाच भेदभाव केला जात नव्हता. माझी आई, बाबा, यांनी मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही फरक केला नाही. आम्हाला तशी शिकवणही दिली नाही. मला तसा कधीच अनुभव आला नाही की मी स्त्री आहे. माझ्यात तशा प्रकारचा दृष्टीकोनही कधी आला नाही. याचे श्रेय माझ्या घरच्यांना द्यावे लागेल. त्यांनी आम्हाला ज्याप्रकारे शिकवले. ते अजूनही आमच्यात आहे. बॉलीवूडमध्ये गेल्यावर विविध प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं.

पुजानं सांगितले होते की, मला बॉलीवूडमध्ये एका टिपिकल पध्दतीनुसार हिरोईनचा फॉरमॅट फॉलो करावा लागत होता. मी असा विचार करायची की, मी हे असे सगळे का करु, त्यामुळे माझे अनेक प्रॉडक्शन हाऊसेस बरोबर वाद झाले होते. मात्र अनेकांनी माझ्या या भूमिकेचे कौतूक केले होते. तर अनेकांनी टीकाही केली होती. मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ब-याचजणांनी मला सांगितले होते की, तु मुलगी असल्यानं तुला तुझा स्वभाव बदलावा लागेल. पण मी कुणाचे ऐकले नाही. मला जे वाटलं तेच केलं.

मला निर्माता व्हायचं होतं. मात्र जेव्हा मी तसे ठरवले तेव्हा माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं गेलं. काहींना मी नको होते. माझ काम आवडत नव्हते. त्यामुळे ते मला नाव ठेवत असे. त्यांचे म्हणणे असे की, पुरुषांना त्यांचे काम करु द्या. ते चित्रपट करतील. जेव्हा मी मोठा संघर्ष करुन एवढ्या मोठ्या पदापर्यत आले होते अशावेळी मी कुणालाही घाबरले नाही. 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

SCROLL FOR NEXT