Bollywood Actress Preity Zinta Tweet On Murder Of Sarpanch In Anantnag Jammu Kashmir
Bollywood Actress Preity Zinta Tweet On Murder Of Sarpanch In Anantnag Jammu Kashmir 
मनोरंजन

'ही'अभिनेत्री म्हणतीय, अजय पंडिता यांना न्याय मिळालाच पाहिजे.

सकाळवृत्तसेवा

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून या घटनेचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियावर या मुद्द्यावर आपली वैयक्तिक मत मांडून पंडिता यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी गेली आहे. याबरोबर अभिनेत्री प्रिती झिंटा हिने याच संदर्भात केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

प्रितीने अजय पंडिता यांना न्याय मिळाला पाहिजे, तसेच दोषींविरोधात कडक कारवाई केली गेली पाहिजे, असं म्हटले आहे. एका सरपंचाची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेनं मला प्रचंड दु:खी आणि अस्वस्थ केलं आहे. या दु:खाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करत आहे. त्यांच्या कुटुंबाला योग्य न्याय आणि दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल. अशी अपेक्षा आहे, असे प्रितीनं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. तसेच अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील या संदर्भात तिचं मत व्यक्त केलं आहे. या मुद्द्यावर बॉलिवूडमधील कलाकार गप्प का बसले आहेत? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

अजय पंडिता यांच्यावर समर्थन न केल्याबद्दल कंगनानं बॉलिवूड स्टार्सवर कडक टीका केली आहे. कंगनानं व्हिडिओमध्ये एका कार्डबोर्डवर लिहिलं होतं की, 'मी एक हिंदुस्थान आहे. अजय पंडिता यांना न्याय मिळालाच पाहिजे'. सरपंच अजय पंडिता यांचे आठ जूनला सायंकाळी ही घटना घडली होती.

लष्कर ए तोयबाशी निगडीत दहशतवादी संघटना 'द रेझिस्टंस फ्रंट'ने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. अजय पंडिता हे काँग्रेसशी संबंधित होते. अजय पंडिता यांच्या घराजवळच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanchanjungha Express Accident: बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, ४ जणांचा मृत्यू

Sambhaji Nagar : पालकमंत्रिपदासाठी भाजप आग्रही;वरिष्ठांच्या भेटीसाठी प्रमुख पदाधिकारी थेट गाठणार मुंबई

Latest Marathi Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

MHT-CET Exam Result : ‘सीईटी’ निकाल पाहण्यास सर्व्हर डाउनचा फटका!

Praful Patel : विधानसभेत राष्ट्रवादीचा ८५ ते ९० जागांवर दावा; प्रफुल पटेल म्हणाले...

SCROLL FOR NEXT