priyanka chopra. 
मनोरंजन

VIDEO: भारतात अध्यात्माचे महत्व मोठे; धर्मांबाबत काय म्हणाली प्रियांका?

सकाळन्यूजनेटवर्क

हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोपडा. नुकतीच तिची ओपरा विंफ्रेच्या  टॉक शोमध्ये मुलाखत झाली. या मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये प्रियांका भारताच्या 'स्पिरिचुअल एनर्जी'बाबत बोलताना दिसली. प्रियांकाने तिच्या आयुष्यातील अनेक  घटना, किस्से, अनुभव या मुलाखतीत सांगितले आहेत. प्रियांका तिच्या 'मेमॉयर अनफिनिश्ड' या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ओपरा विंफ्रेच्या टॉक शोमध्ये आली होती. या वेळी तिने भारताबद्दल तिच्या असणाऱ्या भावना सांगितल्या. मुलाखतीत प्रियांका म्हणाली,'माझे वडील अशोक चोपडा यांनी मला शिकवले आहे की, सर्व धर्मांचे मार्ग एकाच देवाकडे जातात.

मी हिंदू आहे. मी प्रार्थना करते. माझ्या घरी देवाचे मंदिर आहे. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून झाले आहे. त्यामुळे मला ईसाई धर्माबाबत देखील माहीत आहे.' वडिलांबद्दल सांगताना प्रियांका म्हणाली, 'माझे वडील मस्जिदमध्ये गाणं गात होते. त्यामुळे मला मुस्लिम धर्माची देखील महिती आहे. भारतामध्ये आध्यात्माचे महत्व जास्त आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.'

प्रियांकाच्या जीवनावर आधारित मेमॉयर अनफिनिश्ड या पुस्तकात तिने बॉलिवूड ते हॉलिवूड या प्रवासाचे वर्णन केले आहे. तसेच प्रियांकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील या पुस्तकात लिहीले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan : व्हेनेझुएलासारखी परिस्थिती भारतात उद्भवू शकते; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका

Nashik Nomokar Teerth : कुंभमेळ्याच्या धर्तीवर 'णमोकार तीर्था'चे नियोजन; हेलिकॉप्टर सेवेबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या सूचना

Thane Politics: भाजप–राष्ट्रवादी–शिवसेना... ७२ तासांत बदलले तीन पक्ष; राजकीय नेत्यांचा वेगवान ‘यू-टर्न’, मतदार राजाही संभ्रमात

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ४५ हजार व्याज मिळवा! २०२६ मधील पोस्ट ऑफिसची मालामाल करणार FD योजना, Money Saving नक्की वाचा

Latest Marathi News Live Update : अफवावर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचा उमेदवारांना कानमंत्र

SCROLL FOR NEXT