Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: आई आजारी असतांनाच राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीशी केलं लग्न! फोटो व्हायरल

Vaishali Patil

'ड्रामा क्वीन' म्हटली जाणारी टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत बिग बॉसच्या बाहेर आल्यापासून चर्चेत आहे.आता तिच्याशी संबधित एक मोठी बातमी समोर येत आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले आहे.

दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या गळ्यात माळ आहे आणि त्याच्या विवाहाच प्रमाणपत्रासोबत पोज देताना दिसत आहेत. ही बातमी समजल्यानंतर राखीचे चाहते खूप खूश आहेत. मात्र, राखी किंवा आदिल यांच्याकडून अद्याप लग्नाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

दुसऱ्या फोटोत राखी सावंत कागदपत्रांवर सही करताना दिसत आहे. हे मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्यावर राखी सही करत असल्याचं बोललं जात आहे. आदिलही त्याच्या जवळच बसला आहे.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

राखी आणि आदिलच्या विवाह प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर दोघांचे पासपोर्ट आकाराचे फोटो आहेत. मात्र, यावर लग्नाची तारीख 29 मे 2022 लिहिली आहे. त्यावर आणखी एक तारीख नमूद केली आहे – 2 जुलै 2022. राखी आणि आदिलचे लग्न गेल्या वर्षीच झाले होते का असा प्रश्न आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT