Bollywood Actress: बॉलीवूडमध्ये आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून रविनाची वेगळी ओळख आहे. अभिनय, डान्स यामध्ये कुशल असणाऱ्या रविनानं दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये काम केले आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. यशच्या केजीएफच्या दुसऱ्या भागात तिनं काम केलं (Bollywood News) होतं. त्यापूर्वी तिची एक मालिकाही प्रदर्शित झाली होती. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ठाम भूमिका आणि सोशल (KGF 2) मीडियावर परखड बोलणारी अभिनेत्री म्हणून देखील रविनाची ओळख आहे. सध्या तिच्या मुलीची राशाची चर्चा आहे. तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रविनाच्या मुलीनं राशानं (Rasha) तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. सोशल (Raveena Tondon) मीडियावर राशा ही नेहमी अॅक्टिव्ह असते. 90 च्या दशकातील मोठी तारका (Bollywood Actress) असणाऱ्या रविनानं 2004 मध्ये उद्योगपती अनिल थडानी यांच्याशी विवाह केला. तिला राशा नावाची मुलगी आणि रणबीर वर्धन नावाचा मुलगा आहे. राशाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रविनानं 1995 मध्ये दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. आता त्या मुलींची लग्नं झाली आहेत.
रविनाच्या राशाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. राशा दिसायला सुंदर आहे. राशा अभ्यासात जितकी हुशार आहे तेवढीच ती तायक्वांदोमध्ये देखील प्रवीण आहे. तिला तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. राशानं ही वेगवेगळी वाद्येही वाजवते. याशिवाय तिला फोटोग्राफीचा देखील छंद आहे. तिला वाईल्ड फोटोग्राफीची आवड आहे. बॉलीवूडचे जे स्टारकिड आहेत त्यामध्ये राशा ही सर्वाधिक सुंदर आहे. असे सांगितले जाते. राशाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.