मनोरंजन

'गोलमाल'ची रिमी सेन आहे कुठे?: 'फर्निचर' म्हणून हिणवलं गेलं

बॉलीवूडमध्ये (bollywood) काही अभिनेत्री अशा आहेत ज्या कमी वेळेसाठी या क्षेत्रात आल्या त्यानंतर दिसेनाशा झाल्या.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) काही अभिनेत्री अशा आहेत ज्या कमी वेळेसाठी या क्षेत्रात आल्या त्यानंतर दिसेनाशा झाल्या. त्यात एका अभिनेत्राच्या नावाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. ती म्हणजे रिमी सेन.(rimi sen) रिमीनं आपल्या अभिनयानं काही काळ बॉलीवूडमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्यानंतर ती फारशी दिसली नाही. आज रिमीचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याशी संबंधित काही गोष्टी या बातमीच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत. आज रिमी तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. 21 सप्टेंबर 1981 मध्ये कोलकातामध्ये तिचा जन्म झाला. तिनं आतापर्यत हंगामा, धूम, बागबान, गोलमाल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. आपल्या अभिनयानं तिनं मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीही मिळवली होती.

सुंदर व्यक्तिमत्वासाठी रिमी बॉलीवूडमध्ये ओळखली जाते. तिचे चित्रपटही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले. असे असतानाही देखील बॉलीवूडमध्ये फार काळ रमली नाही. तिनं बॉलीवूडला अलविदा केलं. ती बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. त्यासाठी तिनं दोन कोटी रुपयांचं मानधनही घेतलं होतं. रिमीनं बॉलीवूडला रामराम केला याला आता दहा वर्षे होतील. रिमीनं एक बालकलाकार म्हणून बॉलीवू़डमध्ये एंट्री केली होती. तिनं काही जाहिरांतीमध्येही काम केलं. त्यामुळे तिचा चेहरा प्रेक्षकांना नवीन नव्हता. तिनं मॉडेलिंगमध्येही नाव कमावलं. त्यानंतर तिला हंगामामधून पहिल्यांदा ब्रेक मिळाला होता. त्या चित्रपटानं तिला ग्लॅमर दिलं. प्रसिद्धी दिली. तेव्हापासून रिमी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली होती. धूममध्येही ती अभिषेक बच्चनसोबत होती.

बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी झाली असताना देखील तिनं या क्षेत्रापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. आपण बॉलीवूडला रामराम का केला याविषयी तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, त्यात तिनं सांगितलं, मी चित्रपटांमध्ये त्याच त्याच प्रकारची भूमिका करुन थकून गेली होती. मला वेगळं काही करायला मिळेल का हा माझा प्रश्न होता. वेगळ्या प्रकारच्या कलात्मक चित्रपटांमध्ये काम करण्याची माझी इच्छा होती. दुर्देवानं मला त्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. आणि मग मी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला. मी केवळ एक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम करणारी फर्निचर अभिनेत्री होते. असं मला त्यावेळी वाटत असल्याची खंतही रिमीनं व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT