sara ali khan
sara ali khan 
मनोरंजन

'लोका सांगे ब्रह्मज्ञान..', मास्क न घातल्याने सारा झाली ट्रोल

सकाळ ऑनलाइन

‘कोरोना महामारीला रोखण्यासाठी नियमांचे पालन करा’, असे धडे सध्या बॉलिवूडमधील कलाकार सर्वांना देत आहेत. पण हे कलाकार स्वत: या नियमांचे उल्लंघन करताना दिसतायत. काही दिवसंपूर्वी अभिनेता विवेक ओबेरॉय दुचाकीवर मास्क न घालता फिरताना दिसला. त्यानंतर त्याला पाचशे रूपयांचा दंड देखील भरावा लागला होता. तर आता प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानदेखील मास्कशिवाय फिरताना दिसत आहे. सारा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तिचे वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. नुकतंच जिममधून बाहेर पडताना साराला फोटोग्राफर्सनी पाहिलं. यावेळी साराने मास्क घातला नव्हता. मास्कशिवाय बाहेर फिरतानाचे साराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 

जेव्हा फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी साराजवळ आले तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्याजवळ येऊ नका'. साराने मास्क घातला नसल्याने ती फोटोग्राफर्सपासून दूर जात होती. साराचा मास्क न घातलेल्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांनी कमेंट केली, "..आणि ही लोकांना मास्क घालायला आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवायला शिकवते. काम नसेल तर बाहेर निघू नये असंही सांगते." 

अनेक बॉलिवूड कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, आलिया भट, गोविंदा यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे नियमांचे पालन केले नसल्याने साराला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर खडेबोल सुनावले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs IND women T20 : टीम इंडिया शेवटही करणार गोड.? आज बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना

Salman Khan Firing Case: फक्त सलमान खानच नाही, तर इतर दोन प्रसिद्ध अभिनेतेही होते बिश्नोई गँगच्या रडारवर

CM Shinde : अभिनेत्याचा 'कार'नामा! सी-लिंकवर टोल वाचावा म्हणून मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातून नेली कार; पोलिसांनी शिकवली अद्दल

VIDEO: दुबईत भर कॉन्सर्टमध्ये चक्क स्टेजवर नखं कापली; अरिजित सिंगचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "भावा ही कामं घरी कर!"

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT