Shabana Azmi  
मनोरंजन

Viral: शबाना आझमींच्या भाचीसोबत कॅब चालकानं...

गेल्या आठवड्यात त्यांच्या मुलाचा फरहान आणि शिबानी दांडेकरचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Actress: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) हे त्यांच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कामांसाठी देखील ओळखल्या (Bollywood News) जातात. गेल्या आठवड्यात त्यांच्या मुलाचा फरहान आणि शिबानी दांडेकरचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे अख्तर कुटूंबीय गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आले आहे. आता शबाना आझमी या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आल्या आहेत त्यांच्या पुतणीसोबत एका कॅब चालकानं गैरवर्तन केल्याचे दिसून आले आहे. रात्रीच्या वेळी त्या कॅब (Cab Driver) चालकानं केलेल्या या वर्तनाची पोलिसांनी दखल घेतली आहे.

मुंबईतील (Mumbai News) एका कॅब चालकाकडून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याबाबत अभिनेत्री शबाना आझमी यांनी सोशल मीडियावरुन अधिक माहिती दिली आहे. त्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्री आहे. याशिवाय मेघना विश्वकर्मा यांनी फेसबूकवर मोठी पोस्ट लिहिली आहे. त्याची लिंक शबाना आझमी यांनी शेयर केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, माझ्या 21 वर्षीय पुतणीसोबत जे काही झालं ते मी सगळ्यांना सांगु इच्छिते. भयानक परिस्थिती आहे. सोशल मीडियावर आझमी यांचे व्टिट व्हायरल झाले आहे.

मेघना विश्वकर्मा यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, मी लोअर परेलवरुन अंधेरीला जाण्यासाठी कॅब बूक केली होती. माझ्या कॅब चालकानं मला पिक अप केलं. गाडीत बसल्यानंतर मला जाणवले की, त्यानं मला ट्रॅफिक जाम असल्यानं दादरमध्ये उतरवलं. रात्रीच्यावेळी मी कुठे जाणार होते. मला तो प्रकार आवडला नाही. अशाप्रसंगी मला दुसरी कॅब कशी मिळणार होती....असा प्रश्नही मेघना यांनी यावेळी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT