Human Serise Actress Shefali Shah 
मनोरंजन

प्रत्येकवेळी 'सुपरवुमन' का व्हायचं? प्रसिद्ध अभिनेत्रीचा परखड सवाल

दिल्ली क्राईम (Delhi Crime) नावाच्या मालिकेमध्ये शेफाली शहाच्या (Bollywood Actress Shefali Shah) अभिनयाला प्रेक्षकांनी पसंत केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Human Serise Actress Shefali Shah: दिल्ली क्राईम (Delhi Crime) नावाच्या मालिकेमध्ये शेफाली शहाच्या (Bollywood Actress Shefali Shah) अभिनयाला प्रेक्षकांनी पसंत केलं होतं. त्यामध्ये ती महिला पोलीस अधिकाऱ्याची (DCP Delhi) भूमिका तिनं केली होती. विशेष म्हणजे त्या मालिकेमधील अभिनयासाठी तिला वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले होते. आता तिची ह्युमन (Human Web Serise) नावाची मालिका प्रदर्शित झाली आहे. त्याला अपेक्षेनुसार यश मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शेफलीनं आपल्या आजवरच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे. दुसरीकडे प्रत्येकवेळी महिलांनी सुपरवुमन होण्याची गरज नसल्याचं तिनं परखडपणे सांगितलं आहे. (Bollywood actress Shefali Shah Human web serise comment super women)

1995 मध्ये शेफाली शहानं रंगीला (Movie Rangila) मध्ये एक छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर ती सत्यामध्ये मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpeyi) पत्नीच्या भूमिकेत होती. त्या भूमिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर शेफाली बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झाली. गेल्या दोन ते तीन वर्षांच्या काळात तिनं वेगवेगळ्या विषयांवरील मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ह्युमनमध्ये तिनं पहिल्यांदाच न्युरो सर्जनची भूमिका साकारली आहे. दरवेळी महिलाप्रधान भूमिका साकारणं किती आव्हानात्मक असते याविषयी शेफालीनं आपलं मत व्यक्त केलं आहे.

शेफाली म्हणते, आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यातून अनेक आव्हानांचा सामना करता आला. मला त्या भूमिकेतून खूप काही शिकायला देखील मिळाले. त्याबाबत एक गोष्ट मला प्रेक्षकांसोबत शेयर करायला आवडेल. ती म्हणजे महिलांनी प्रत्येकवेळी सुपरवुमन होण्याची काही गरज नाही. आपण कधीकधी काही गोष्टींना सहजपणे नकारही देऊ शकतो. मात्र त्याप्रसंगी तो पुढाकार घेण्यासाठी आपली निर्णयक्षमता सक्षम असणे गरजेचं असल्याचं शेफालीनं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी तिची ह्युमन नावाची मालिका प्रदर्शित झाली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCERT AI Training: आनंदाची बातमी! आता NCERTकडून शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार 5 दिवसांची एआय ट्रेनिंग, अशा प्रकारे करा नोंदणी

Dabeli Sandwich Recipe: भाऊबीजनिमित्त लाडक्या भावासाठी सकाळी नाश्त्यात बनवा दाबेली सँडविच, सोपी आहे रेसिपी

Neeraj Chopra : गोल्डन बॉयची नवी ओळख..! ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये 'लेफ्टनंट कर्नल' हा सन्मान प्रदान

Shubman Gill : पाकड्यांचे किडे वळवळले...! शुभमन गिलसोबत हात मिळवला अन् नंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा दिला, कॅप्टनने काय केले ते पाहा? Video

Abhyanga Snan Benefits: फक्त दिवाळीतच नाही! अभ्यंगस्नान शिशिर ऋतूपर्यंत करा आणि मिळवा वर्षभराची ऊर्जा

SCROLL FOR NEXT