Shilpa Shetty news
Shilpa Shetty news  esakal
मनोरंजन

Viral Video: शिल्पाला असं कधी पाहिलयं?

युगंधर ताजणे

Shilpa Shetty Hot Look Compared to Urfi Javed: शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिनं नेहमीच तिच्या फिटनेसकडे इतर गोष्टींपेक्षा अधिक महत्व दिलं आहे. नुकताच शिल्पा शेट्टीटचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात (Bollywood News) पार पडला. सोशल मीडियावर फिटनेस फ्रिक म्हणून लोकप्रिय झालेल्या शिल्पाचा चाहतावर्ग मोठा आहे. भलेही शिल्पा पूर्वीप्रमाणे चित्रपट, (Bollywood Actress) वेबसीरिजमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती कायम अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. शिल्पा ही तिच्या वेगवेगळ्या लूकसाठी देखील ओळखली जाते. वयाची चाळीशी पार केल्यानंतर देखील शिल्पाचं देखणेपण हे चाहत्याचं लक्ष वेधून घेताना दिसतं.

शिल्पाच्या शेट्टीच्या फिटनेसची तुलना ही बॉलीवूडमधील काही अभिनेत्रींशी केली (Urfi Javed) जाते. सध्या तिची तुलना ही आघाडीची अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदशी केली गेल्याने नेटकऱ्यांनी शिल्पाच्या एका फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे काही काळ शिल्पालाही नवल वाटले आहे. आपल्याला नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया का दिल्या असतील असा प्रश्न तिला पडला आहे. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये शिल्पाचा एक भन्नाट लूक समोर आला आहे. त्यामध्ये ती भलतीच बोल्ड अन् सुंदर दिसते आहे. तिचा तो लूक पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फीसोबत केली आहे.

वास्तविक उर्फीचा सोशल मीडियावरील कोणताही लूक हा नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय असतो. ती अजब - गजब फॅशन स्टाईल करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. त्यामुळे शिल्पानं देखील तिच्याच प्रमाणे हटके लूक करुन वेगळेपणा दाखवण्याचा केलेला प्रयत्न नेटकऱ्यांना हास्यापद वाटला आहे. ब्ल्यु आणि रेड कलरमधील तिच्या वेगळ्या वेषभुषेतील तो फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत आहे.

शिल्पा तिच्या निक्कमा या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी बोल्ड लूकमध्ये दिसली होती. बऱ्याच दिवसांनी तिनं चित्रपटातून प्रेक्षकांची पसंती मिळवलेली होती. दरम्यान शिल्पा शेट्टी ही रियॅलिटी शो मधून प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय झालेली असते. असं म्हटलं जातं की, मनोरंजन क्षेत्रामध्ये सर्वात जास्त सर्चिंग असणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिल्पा शेट्टी आहे. तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल, कुटूंबाबद्दल, वैयक्तिक आयुष्याविषयी नेटकऱ्यांना उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT