Bollywood Actress Sonam Kapoor commented on Mahira Khan photos Google
मनोरंजन

Sonam Kapoor: माहिरा खानच्या फोटोवर सोनमची कमेंट वाचून खूश होतील पाकिस्तानी, असं काय म्हणालीय अभिनेत्री?

माहिरा खान ही पाकिस्तानी सिनेमे आणि टी.व्ही मालिकांमधून काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

प्रणाली मोरे

Sonam Kapoor: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आपल्या अभिनयासाठीच नाही तर सुंदर दिसण्यासाठी देखील लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. आज फक्त पाकिस्तानात नाहीत तर भारतातही तिचे चाहते आहेत. आता बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरनं देखील तिची तोंडभरून प्रशंसा केली आहे. (Bollywood Actress Sonam Kapoor commented on Mahira Khan photos)

माहिरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय पहायला मिळते. नेहमी ती आपले फोटो शेअर करताना दिसते,ज्यावर तिचे चाहते रिअॅक्ट व्हायला क्षणाचाही विलंब लावत नाहीत. आता माहिरानं नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवर बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरनं देखील प्रतिक्रिया देली आहे.

माहिरा खाननं इन्स्टाग्रामवर आपले कितीतरी पोर्ट्रेट शेअर केले आहेत. नेहमीप्रमाणे माहिराच्या या पोस्टवर देखील लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.तिचे हे पोर्ट्रेट फोटो लोकांना खूपच आवडलेले आहेत. तर याच माहिराच्या फोटोंवर आता अनिल कपूर यांच्या लाडक्या मुलीनं म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरनं कमेंट केली आहे. सोनमने माहिराची प्रशंसा करत लिहिलं आहे, ''तू खूप सुंदर आहेस''. आपल्या कमेंटपुढे सोनमने हार्ट इमोजी ड्रॉप केला आहे.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

माहिरा खान ही पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं पाकिस्तानच्या कितीतरी सिनेमातून आणि टी.व्ही मालिकांमधून काम केलं आहे. त्याचसोबत तिनं बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची चमक दाखवलेली आहे. २०१७ मध्ये शाहरुख खानसोबत 'रईस' सिनेमात माहिरा खान दिसली होती. या सिनेमात शाहरुख सोबत तिची जोडी खूपच शोभून दिसली होती. माहिराच्या अभिनयाचं देखील कौतूक झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT