मनोरंजन

'डिट्टो श्रीदेवीच'! दीपाली सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या हुबेहुब आर्टिस्टची (social media artist) चर्चा होत असते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या हुबेहुब आर्टिस्टची (social media artist) चर्चा होत असते. सध्या प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी हिच्या (bollywood actress shridevi) सारख्या दिसणाऱ्या आर्टिस्टची चर्चा आहे. ती डिट्टो श्रीदेवी सारखीच दिसत असल्याचा दावा फॅन्सनं केला आहे. त्यामुळे तिच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षावही केला आहे. ती चर्चेतही आली आहे. दीपाली चौधरी (dipali chaudhari) नावाच्या आर्टिस्टचा तो व्हिडिओ आतापपर्यत अनेकांनी पाहिला आहे. त्यावरुन तिला काहींनी ट्रोलही केले आहे. दीपालीला श्रीदेवीची कॉपी म्हणून ओळखलं जात आहे. कित्येकांनी तिला दुसरी श्रीदेवी असंही म्हटलं आहे. अशाप्रकारे सोशल मीडियावर तिच्यावर चाहत्यांनी कौतूकाच्या प्रतिक्रिया पोस्ट केल्या आहेत.

इंस्टावर दीपालीचे 30 हजाराहून अधिक फॉलोअर्स (instagram followers) आहेत. तिनं श्रीदेवी सारखा लूक करुन अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रीदेवीच्या चित्रपटातील सीन आणि गाण्याचे रिल करूनही दीपालीनं चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. आपल्याला श्रीदेवीच्या नावानं ओळखल जात याचा तिला अभिमान आहे. त्याबद्दल ती म्हणते बॉलीवूडची दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या नावानं आपल्याला ओळखलं जाणं, ती तुमची ओळख होणं यासारखा दुसरा कुठला सन्मान नाही. त्यामुळे आपण आणखी लोकप्रिय होऊ लागतो. त्याचा आपल्याला फायदाच होतो. असंही दीपालीनं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रेटींसारखे दिसणाऱ्या आर्टीस्टचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे.

प्रख्यात अभिनेत्री कियारा अडवाणीसारख्या दिसणाऱ्या एका लहान मुलीच्या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्युज मिळाले होते. दीपालीच्या प्रत्येक पोस्टला तिच्या चाहत्यांनी तिला श्रीदेवी असं म्हणून संबोधलं आहे. सध्याचा तिचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तिनं श्रीदेवीच्या लाडला या चित्रपटातील एका सीनवर रिल केलं आहे. जे व्हायरल झाले आहे. चाहत्यांनी त्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत दीपालीचं कौतूक केलं आहे. प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांचं 2018 मध्ये निधन झालं होतं. दुबईतील एका हॉटेलमध्ये त्या मृतावस्थेत सापडल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT