मनोरंजन

बॉलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री आईसाठी होती 'स्पॉटबॉय'

बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी राहिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी राहिला आहे. त्या सेलिब्रेटींचा चाहतावर्गही मोठा आहे. अद्यापही त्यांची लोकप्रियता कायम आहे. भलेही त्या सतत चर्चेचा विषय असोत मात्र त्यांनी केलेल्या संघर्षामुळे त्यांची ओळख आणखी दृढ झाली आहे. आता आपण अशा प्रख्यात अभिनेत्रीची ओळख करुन घेणार आहोत त्या अभिनेत्रींनं चक्क एअरपोर्टवर स्पॉटबॉय म्हणून काम केले होते. त्या अभिनेत्रीच्या मुलीनं आपल्या पुस्तकामध्ये त्याविषयी खुलासा केला आहे.

बॉलीवूडची कोणेएकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री व्टिंकल खन्नाच्या ऑन कॅमेरा, ऑफ कॅमेरा या पुस्तकामध्ये आपली आई डिंपल कपाडियाच्या अनेक गोष्टींविषयी खुलासा केला आहे. त्यामुळे चाहत्यांना आगळ्या वेगळ्या गोष्टींची मेजवानी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहे. त्या पुस्तकामध्ये असे सांगण्यात आले आहे की, व्टिंकल खन्ना बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी आईसाठी एका स्पॉटबॉयच्या भूमिकेत होती. तिला ते काम करावं लागत होतं. आपल्या पुस्तकामध्ये तिनं याविषयी खुलासा केला आहे. आई ज्यावेळी एखाद्या टूरसाठी निघायची त्यावेळी तिच्या बॅग्ज कॅरी करण्याचे काम व्टिंकल करत असे. हे तिनं नमूद केलं आहे.

त्याचे काय आहे व्टिंकलनं तिच्या नव्या पुस्तकाचे कव्हर पेजचा फोटो आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन शेयर केला आहे. नेहमीप्रमाणे त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक वाचकांनी व्टिंकलला तिच्या नव्या पुस्तकाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वीच्या तिच्या पुस्तकालाही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या नव्या पुस्तकाची वाचकांना उत्सुकता आहे. त्यावर भावना सोमैय्यानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये ती म्हणते, ही माझ्यासाठी वेगळ्या आठवणी घेऊन आली आहे. भावनानं या पुस्तकाचे लेखन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, सुनेकडून ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT