The kashmir files Twinkle khanna reaction
The kashmir files Twinkle khanna reaction  esakal
मनोरंजन

'काश्मीर फाईल्सची' टिंगल ट्विंकलला पडली महागात, नेटकऱ्यांनी झापलं

युगंधर ताजणे

The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्सचा फिव्हर (Bollywood Movie) अजूनही सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून या चित्रपटानं मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे लक्ष घेतले आहे. काहींनी राजकीय प्रचारासाठी या (Bollywood News) चित्रपटाचा वापर केल्याची टीकाही करण्यात आली होती. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी काश्मीर फाईल्सवरुन प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (Director Vivek Agnihotri) त्यापैकी आमीर खान, सलमान खान यांच्यासारख्या सेलिब्रेटींनी या चित्रपटावरील दिलेल्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) पत्नीनं ट्विंकलनं काश्मीर फाईल्सवर शेलकी टिप्पणी केली आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.

बॉक्स ऑफिसवर काश्मीर फाईल्सनं आतापर्यत 250 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. अनेक राज्य़ांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर सातत्यानं वादही सुरु आहे. आता ट्विंकलनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. काश्मीर फाईल्सवर नकारात्मक प्रतिक्रिया देणारी ट्विंकल (Twinkle Khanna) ही काही पहिलीच सेलिब्रेटी नाही. यापूर्वी देखील बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यावर सडकून टीका केल्याचे दिसून आले आहे. ट्विंकलनं टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये तिनं काश्मीर फाईल्स चित्रपटाची टिंगल केली आहे. तिनं म्हटलं आहे की, मला नेल फाईल्स या नावानं चित्रपट तयार करायचा आहे.

या लेखानंतर ट्विंकलवर सोशल मीडियातून मोठ्य़ा प्रमाणावर टीका होऊ लागली आहे. अक्षय कुमारचं नाव घेऊन तिच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. अक्षयनं काश्मीर फाईल्सवर एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यानं प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांना शुभेच्छा दिल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यानं आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावरही टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT