अभिनेता आदित्य रॉय कपूर हा बॉलीवूडमधील सर्वात देखण्या पुरुषांपैकी एक आहे.यात काही शंका नाही. देशभरात आणि त्यापलीकडे त्यांची फॅन फॉलोविंग तगडी आहे. अनेक मुलींच्या हृदयावर तो राज्य करत आहे. आदित्य आज 16 नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आज तो 36 वर्षाचा झाला. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्याच्या अफेअरच्याही अनेक चर्चा रंगल्या. त्यात पहिलं नाव येतं ते रिया चक्रवर्तीचं
सुशांत सिंग राजपूतला भेटण्यापूर्वी रिया आदित्यला डेट करत होती. एमटीव्ही शोमध्ये एकत्र काम केल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि आदित्य रॉय कपूर यांची मैत्री झाली. रिया आणि आदित्यने 2012 ते 2014 म्हणजे दोन वर्षे एकमेकांना डेट केले. एका रिपोर्टनुसार त्यांचा ब्रेकअप खुप नाते अत्यंत वाईट रित्या ब्रेकअप झाला. काही काळानंतर दोघांचांही ब्रेकअप झाला असला तरी आदित्य अजूनही रियावर प्रेम करतो आणि तिच्याबद्दल खूप पझेसिव्ह असल्याचं बोललं जातं.
पिंकविलामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 2014 मध्ये रिया चक्रवर्ती 'सोनाली केबल' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिला किसिंग सीन द्यायचा होता, मात्र हा सीन करण्यास तिचा नकार होता. पण याचकाळात रिया आणि आदित्यचं ब्रेकअप झाला, त्यानंतर रियाने किसिंग सीनला होकार दिला होता. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, आदित्यचा बदला घेण्यासाठी त्याला चिडवण्यासाठी रियाने या चित्रपटात किसिंग सीन दिले होते. रिपोर्ट्सनुसार, आदित्य रॉय कपूरला रियाच्या या निर्णयाचा धक्काच बसला होता.
त्यानंतर आदित्यनेही 2013 मध्ये आलेल्या 'आशिकी' चित्रपटात आदित्य रॉय कपूरने श्रद्धा कपूरसोबत किसिंग सीन सोबतच बोल्डसीन्स देखील दिले होते. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री त्यांच्या 2013-चित्रपट 'आशिकी 2' च्या शूटिंग आणि प्रमोशन दरम्यान चर्चेत आली होती. त्यावेळी दोघे डेटिंग करत असल्याची अफवा पसरली होती आणि करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्येही ते एकत्र दिसले होते. या दोघांचाही काही वर्षांनंतर ब्रेकअप झाल्याचं सांगितलं जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.