Aishwarya rai,thoughts of suicide and sushant singh rajput death...vivek oberoi break silence after years Esakal
मनोरंजन

Bollywood: ऐश्वर्या रायशी ब्रेकअप अन् आत्महत्येचा विचार..,अखेर अनेक वर्षांनी विवेक ओबरॉय बोललाच

एकेकाळी विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते पण काही कारणानं दोघं विभक्त झाले ज्याची तेव्हा देखील खूप चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

vivek oberoi: बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आपल्या सिनेमांपेक्षा अधिक वैयक्तिक आयुष्यामुळे ओळखला जातो. अभिनेत्यानं आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. पण त्याचं वैयक्तिक आयुष्य नेहमी अडचणीचं राहिलं.

'कंपनी','साथिया','शूटआऊट अॅट लोखंडवला' सारख्या सिनेमातून मुख्य भूमिका साकारलेला विवेक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्यानं मोकळेपणानं आपल्या करिअरविषयी आणि वैयक्तिक आयुष्याविषयी बातचीत केली आहे,ज्यामुळे पुन्हा एकदा त्यानं सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.(Aishwarya rai,thoughts of suicide and sushant singh rajput death...vivek oberoi break silence after years)

आता हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की विवेक ओबेरॉयचं बॉलीवूड मधलं करिअर खूप आधीच संपलं आहे. यामुळे तो डिप्रेशनमध्ये देखील गेला होता. नुकतीच विवेकने एक मुलाखत दिली, ज्यात त्यानं आपल्या आयुष्यातील खडतर काळावर भाष्य केलं जो काळ त्याला ठरवूनही आठवयाचा नाही. अभिनेत्यानं खुलासा केला अहे की एक वेळ त्याच्या आयुष्यात अशी आली होती की त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. आणि यामुळेच आपण सुशांत सोबत काय घडलं असेल हे लगेच समजू शकतो असं देखील विवेक म्हणाला. विवेकनं आपल्या संवादा दरम्यान ऐश्वर्याचा देखील उल्लेख केला.

विवेक म्हणाला की जेव्हा त्याचे ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाले होते तेव्हा फक्त वैयक्तिक आयुष्यच नाही तर आपल्या प्रोफेशनल लाइफवरही त्याचा खूप परिणाम झाला,खूप नुकसान सहन करावं लागलं. विवेक म्हणाला की,''त्याच्याकडे तेव्हा १८ महिने काहीच काम नव्हतं. विवेकचं म्हणणं होतं की खूप चांगले सिनेमे करूनही आपल्याला कोण काम देऊ पाहत नव्हतं. तो काळ खूप अडचणीचा होता. ज्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचं विवेक म्हणाला. आणि त्यामुळे आत्महत्येचा निर्णयही आपण घेतला होता असं देखील तो म्हणाला''.

विवेक ओबेरॉयने मुलाखतीत हे देखील सांगितलं की त्याच्या आजुबाजूला त्यावेळी पूर्ण नकारात्मकतेचं वातावरण होतं. ज्यामुळे तो सतत चिंताग्रस्त असायचा. त्याला वाटतं की त्याला त्यावेळी पूर्ण कोलमडून टाकण्याचा कोणाचातरी हेतू होता. अभिनेत्यानं मुलाखतीत पुढे आपल्या पत्नीचं नाव घेत म्हटलं की,''त्या वाईट काळात माझी पत्नी प्रियंकाने मला खूप खंबीर साथ दिली, तिच्यामुळे मी स्वतःला ओळखू शकलो''. विवेक पुढे म्हणाला,''आपल्याला आपलं आयुष्य संपवावसं वाटणं म्हणजे खूप मोठा अर्थ दडलाय यात,आणि यामुळेच मी सुशांत सिंग राजपुतला कुठल्या परिस्थितीतून जावं लागलं असेल हे नीट समजू शकतो''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT