Alia-Ranbir Daughter
Alia-Ranbir Daughter Esakal
मनोरंजन

Alia-Ranbir Daughter: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात....आलियाच्या लेकीची बार्सिलोनामध्ये हवा!

सकाळ डिजिटल टीम

(bollywood Alia Bhatt, Ranbir Kapoor congratulated by FC Barcelona on birth of daughter Raha) अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या नावाची घोषणा करत तिचा एक ब्लर फोटो शेअर केला होता. या जोडप्यानं मुलीचं नाव राहा कपूर असं ठेवलं आहे. त्यांनी लेकीच्या फोटोसोबत मिनी बार्सिलोनाच्या जर्सीची झलक शेअर केली होती.ज्यावर राहा नाव लिहिलेलं दिसतंय. नाव समोर आल्यानंतर तिच्यावर कौतूक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

दरम्यान आता स्पॅनिश फुटबॉल क्लबने या जोडप्याचं अभिनंदन केले आहे. शुक्रवारी ट्विटरवर एफसी बार्सिलोनाने आलियाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला तिचा फोटो पुन्हा शेअर केला आहे. त्यांनी पोस्टला कॅप्शन दिले, " अभिनंदन, @aliaa08 आणि रणबीर कपूर!! एक नवीन बार्सा फॅन जन्माला आला आहे. बार्सिलोनामध्ये तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही."

फुटबॉल क्लबने त्यांचा हा फोटो शेअर केल्यानंतर आणि या जोडप्याचे अभिनंदन केल्यानंतर, चाहत्यांनी ट्विटवर प्रतिक्रिया देत पुन्हा या बाळाचं अभिनंदन केलं आहे.  "हि खुप मोठी गोष्ट आहे! एफसी बार्सिलोनाने रणबीर आणि आलियालाच्या मुलिला शुभेच्छा दिल्या आहे," एकाने कमेंट केलीय. दुसरा चाहता म्हणालाय, "जगातील सर्वात मोठ्या क्लबने मुलीला आशीर्वाद दिलाय."

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

तुम्हाला कदाचित माहित नसेल, रणबीर एफसी बार्सिलोनाचा तगडा फॅन आहे. काही वर्षांपूर्वी, क्लबने त्याला बार्सिलोनाचा एक शर्टही भेट दिला होती. ज्यावर लियोनेल मेस्सीची स्वाक्षरी होती. 2011 मध्ये रणबीर बार्सिलोनामध्ये मेस्सीला भेटला होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार  रणबीरने 2011 मध्ये म्हटले होते, "मी फक्त एक अभिनेता आहे, मेस्सी तर एक रॉकस्टार आहे... जर मी अभिनेता नसतो, तर मी प्रोफेशनल फुटबॉल खेळलो असतो किंवा किमान या खेळात येण्यासाठी संघर्ष तरी केलाच असता." आता रणबीरचं अपुर्ण स्वप्न त्यांची मूलगी पुर्ण करेल की काय अशी चर्चा रंगली आहे.

 काही वर्षे डेटिंग केल्यानंतर आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती. रणबीरच्या मुंबईतील वास्तू या निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर जवळपास २ महिन्यानंतर आलियानं आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली अन् त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी आलियानं एका परिला जन्म दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT