Anushka Sharma-Virat Kohli rent a home in juhu, read details inside Google
मनोरंजन

Bollywood:अनुष्का-विराटचा बदलला मुंबईतील पत्ता; आता 'या' ठिकणी राहणार भाड्याने, महिन्याचं भाडं ऐकाल तर..

अनुष्का विराटने प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा मुंबईतील बंगलाही भाड्यावर घेत तिथे रेस्टॉरंट सुरु केल्याचं कळत आहे.

प्रणाली मोरे

Anushka Sharma-Virat Kohli:अनुष्का शर्मा आणि विराट कोहली संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. अनुष्का आणि विराट आपल्या नव्या घरामुळे सध्या चर्चेत आहेत. काही दिवस आधी कपलने गायक किशोर कुमार यांच्या जुहू स्थित बंगल्याला भाडेतत्वावर घेतलं होतं. तर आता पुन्हा एक बातमी समोर आली आहे की विराट-अनुष्का यांनी मुंबईत भाड्यावर आणखी एक नवीन फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटचं भाडं ऐकाल तर किंमत ऐकून नक्कीच चक्रावून जाल एवढं मात्र नक्की. आणि अर्थात हा प्रश्न तर नक्कीच पडेल की कोट्याधीश असूनही सटासट भाडेतत्त्वावर का जागा घेत चाललेयत?(Anushka Sharma-Virat Kohli rent a home in juhu, read details inside)

रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने मुंबईच्या जुहू मध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. कपलचा हा आलिशान फ्लॅट एका उंच इमारतीत चौथ्या मजल्यावर आहे. बोललं जात आहे की, १६५० स्क्वेअर फीट मध्ये पसरलेल्या या फ्लॅटचे भाडे २. ७६ लाख महिना असे आहे. म्हणजे अनुष्का आणि विराट कोहली या लक्झरी फ्लॅटसाठी दर महिन्याला जवळपास पावणे तीन लाख रुपये भाडं देणार आहेत.

बातम्या तर अशा देखील आहेत की विराट आणि अनुष्काने आपल्या स्वीट होमसाठी जवळपास साडेसात लाख रुपये डिपॉझिट देखील भरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का आणि विराटनं घेतलेला हा भाड्याचा फ्लॅट माजी क्रिकेटर समरजीतसिंग गायकवाडचा आहे. या नव्या आलिशान घरातून अनुष्का आणि विराट रोज समुद्राचा अद्भुत नजारा आता पाहू शकणार आहेत.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने याआधी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध गायक-अभिनेता किशोर कुमार यांचा बंगला भाड्याने घेतला होता. बोललं जात आहे की या दोघांनी इथे एक रेस्टॉरंट सुरू केलं आहे.

याव्यतिरिक्त वरळी येथील ओमकार बिल्डिंगमध्ये ३५ व्या मजल्यावर अनुष्का-विराटचा स्वतःचा हक्काचा फ्लॅट आहे. बातम्यांनुसार,विराट-अनुष्काच्या लक्झरी फ्लॅटची किंमत जवळपास ३४ करोड रुपये आहे. त्यांच्या घरात त्या सर्व सुविधा आहेत,ज्यांना पाहिल्यानंतर नक्कीच तिथून कुणाचाच पाय बाहेर पडणार नाही. एवढंच नाही तर या दोघांचा वर्सोवा येथे देखील एक महागडा फ्लॅट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

मुख्यमंत्र्यांसमोर शरण गेलेला भूपती गद्दार, त्याला धडा शिकवणार! माओवाद्यांनी जारी केलं पत्रक, नेमकं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT