John abraham esakal
मनोरंजन

Attack : टॉलीवूडवर जॉन भडकला, 'मी बॉलीवूड अभिनेता त्या...'

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हा त्याच्या हटके अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.

सकाळ ऑनलाइन टीम

Bollywood Movies: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हा त्याच्या हटके अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. त्याचा सोशल मीडियावर चाहतावर्गही मोठा आहे. सध्या तो त्याच्या अटॅक (Attack) नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्या चित्रपटाच्या ट्रेलरला (Video Trailer) प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. अटॅकचा पहिला भाग आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. जॉनच्या या अॅक्शनपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्याच्या प्रमोशनच्यावेळी त्यानं काही धक्कादायक वक्तव्यं केली आहे. बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमाननं यापूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांपुढे बॉलीवूड चित्रपट चालत नसल्याची खंत व्यक्त केली होती. बॉलीवूडमध्ये (Bollywood News) टॉलीवूडच्या तुलनेत हिरोइझम कमी पडत असल्याचे त्यानं सांगितलं होतं.

दुसरीकडे जॉननं बॉलीवूड आणि टॉलीवूड यांची तुलना केली आहे. जॉनचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटांचे नेहमीच मोठ्या प्रमाणात कौतुक होते. दाक्षिणात्य चित्रपटांबाबत जॉननं एक प्रतिक्रिया दिली आहे. जॉन अब्राहम हा प्रभासच्या सालार चित्रपटामध्ये काम करणार असल्याची चर्चा होती. त्यावरुन जॉनला विचारण्यात आले होते. त्यावेळी तो म्हणाला, मी कधीही क्षेत्रीय चित्रपटांमध्ये काम करणार नाही. मी एक हिंदी चित्रपट अभिनेता आहे. आणि तिथेच राहणे पसंत करेल. मला सेकंड लीड हिरो होण्यात काहीही स्वारस्य नाही. मी इतर कुठल्याही दुय्यम कलाकाराची भूमिका करणार नसल्याचे त्यानं सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रभासच्या सालारची चर्चा होती. त्यामध्ये जॉन अब्राहम काम करणार असल्याची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी जॉन एका पत्रकारावर भडकला होता. त्यानं अटॅकच्या प्रमोशन प्रेसमध्ये काश्मीर फाईल्सवरुन प्रश्न विचारला होता. त्यावर जॉननं त्याला झापले होते. अटॅकमध्ये जॉननं एका आर्टिफिशियल इंटेलिजिन्स ऑफिसरची भूमिका केली आहे. त्यात तो वेगळ्या रोलमध्य़े दिसणार आहे. आतापर्यत जॉनच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथवेन...मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा..

Karad fire Accident: पुणे- बंगळूर महामार्गावर ढेबेवाडी फाट्यावर ई-बाईक खाक; चालक दुचाकी रस्त्याकडेला लावून दूर

Latest Marathi News Updates: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

हो, मी डेट करतेय... घटस्फोट अन् ब्रेकअपनंतर रुपाली भोसले पुन्हा प्रेमात! म्हणाली, 'जो माझ्या आयुष्यात येईल त्याला...

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT