Divorce2022 bollywood celebrity Esakal
मनोरंजन

Divorce2022: नुसते घटस्फोट! जोडीदाराला वैतागून यंदा या कलाकारांनी घेतले काडीमोड..

सकाळ डिजिटल टीम

मनोरंजन विश्वात कधी कुणाच्या जोड्या जूळतील आणि कधी तूटतील याचा काही भरोसा नाही. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अनेक वर्ष एकत्र संसार करत नंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या वर्षीही अशाच काही लोकप्रिय जोडप्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

हनी सिंग - शालिनी तलवार

हनी सिंग - शालिनी तलवार

गायक-रॅपर हनी सिंगने यावर्षी त्याची पत्नी शालिनी तलवारसोबत 21 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. यापूर्वी 2021 मध्ये, शालिनीने त्याच्याविरूद्ध घरगुती अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर घटस्फोटासाठी अर्ज केला होता. न्यायालयात प्रदीर्घ खटल्यानंतर अखेर या वर्षी ८ सप्टेंबर रोजी दोघांचा घटस्फोट झाला.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

धनुष - ऐश्वर्या रजनीकांत

धनुष - ऐश्वर्या रजनीकांत

टॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक धनुषने 2004 मध्ये दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतशी लग्न केले. तथापि, लग्नाच्या जवळपास 18 वर्षानंतर दोघांनीही वेगवेगळ्या मार्गावर चालण्याचा आणि त्यांचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतला. हे जोडपे जानेवारीमध्ये विभक्त झाले आणि त्यांच्या निर्णयाबद्दल बोलताना त्यांच्या संबंधित Instagram खात्यावर एक दीर्घ विधान जारी केले. मात्र आता पुन्हा ते एकत्र आले आहे.

इम्रान खान - अवंतिका मलिक

इम्रान खान - अवंतिका मलिक

बॉलीवूडचा माजी अभिनेता इम्रान खाननेही पत्नी अवंतिका मलिकसोबतचे जवळपास 11 वर्षांचे वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांना मुलगी इमारा देखील आहे. ही जोडी आता जवळपास दोन वर्षांपासून वेगळी राहात असली तरी, दोघांकडून त्यांच्या घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

सोहेल खान - सीमा सजदेह

सोहेल खान - सीमा सजदेह

सीमा सजदेहसोबत 1998 मध्ये सोहेल खानही लग्नगाठ बांधली. पे दोघ यावर्षी वेगळे झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, हे दोघे बरेच दिवस वेगळे राहत होते. त्यांना निर्वान आणि योहान ही दोन मुले आहेत. ब्रेकअपनंतर सीमाने इन्स्टाग्रामवर तिचे नाव सीमा खानवरून बदलून सीमा किरण सजदेह ठेवले

करण मेहरा - निशा रावल

करण मेहरा - निशा रावल

हिंदी टिव्ही मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून करण मेहरा ओळखला जातो. आहे. करणने त्याची पत्नी निशा रावलपासून घटस्फोट घेतल्याने तिने अभिनेत्यावर घरगुती अत्याचार आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप लावला होता.

रफ्तार - कोमल वोहरा

रफ्तार - कोमल वोहरा

फेमस रॅपर राफ्तार आणि त्याची जोडीदार, इंटिरियर डिझायनर कोमल वोहरा यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. सहा वर्षांच्या लग्नानंतर या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांचा घटस्फोट होण्याची शक्यता आहे. अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की घटस्फोट प्रक्रियेस उशीर झाला कारण 2016 मध्ये लग्न केलेल्या जोडप्याने 2020 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला, कोरोना काळापासूच हे जोडपं वेगळे राहत होते.

सना अमीन शेख - एजाज शेख

सना अमीन शेख - एजाज शेख

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री सना अमीन शेख हिने प्रसिद्ध टेलिव्हिजन दिग्दर्शक एजाज शेखसोबत लग्न केलं. या वर्षी 13 सप्टेंबर रोजी त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. गेल्या सहा वर्षांपासून या जोडप्याचं लग्न झालं होतं आणि त्यांच्या घटस्फोटाच्या अचानक घोषणेनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

कृतिका खुराणा-आदित्य छाबरा

कृतिका खुराणा-आदित्य छाबरा

लोकप्रिय सोशल मीडिया स्टार कृतिका खुराणा हिने तिचा प्रियकर आदित्य छाबरा सोबत एप्रिल 2022 मध्ये लग्न केले. 12 ऑक्टोबर रोजी कृतिका खुरानाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आणि सहा महिन्यांनंतर तिच्या पतीपासून विभक्त झाल्याचं सांगितलं . लग्न मोडलं ही बातमी कळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT