Bollywood choreographer Remo Dsouza speaks about racism against him due to his dark complexion
Bollywood choreographer Remo Dsouza speaks about racism against him due to his dark complexion  
मनोरंजन

'काळा म्हणून कितीवेळा हिणवलं, हार मानली नाही'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधला प्रसिध्द कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसुझा हा त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यावरुन चर्चेत आला होता. जीममध्ये वर्कआऊट करताना त्याला हद्यविकाराचा झटका आला होता. आता त्याची तब्येत ठीक असून त्यानं त्याच्या गतकाळातील काही कडवट आठवणींना उजाळा दिला आहे. त्यानं जे काही सांगितलं ते मोठं धक्कादायक होतं. अनेक बड्या कलाकारांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात बिकट प्रसंग, अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. रेमोची गोष्टही काही वेगळी नव्हती.

रेमोनं सांगितलं मला सगळेजण काळा म्हणून चिडवायचे. आता मी जर दिसायला काळा होतो तर त्यात माझी चूक काय होती. मात्र लोकं सतत मला माझ्या रंगावरुन चिडवत असतं. त्याचा मला राग येत असे. पण त्यावेळी मी काय करणार होतो. माझ्याकडे ना काही काम होते ना मोठं नाव. म्हणून जे काही चालले आहे ते मुकाट्यानं सहन करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. माझ्या रंगाचा मला लहानपणी फार त्रास झाला होता. शाळेत असताना काळा म्हणून लोक चिडवायचे, कॉलेजलाही रंगभेदाला सामोरं जावे लागले होते.

रेमो म्हणाला जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये लोकांना रंगभेदाला सामना करावा लागला होता. भारतातही हा प्रकार दिसतो. मला त्याचा अनुभव आला आहे. वर्णभेदाच्या प्रकाराला मला तोंड द्यावे लागले होते. याचे मुख्य कारण म्हणजे माझा रंग. मी काळा होतो आणि त्यावरुन सगळेजण चिडवायला सुरुवात करायचे. मी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याचा मला त्रास होत होता. आता सगळेजण म्हणतात की आपण रंगभेदाचा सामना करायला हवा म्हणून. पण त्याची कृतीत्मक अंमलबजावणी कोणी करायला मागत नाही. आता असे वाटते मी त्यावेळी त्या रंगभेदाच्या विरोधात बोलायला हवे होते.

रेमोचे असे म्हणणे होते की, जेव्हा तुम्ही कुणाची निंदा करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्या व्यक्तीचे चांगले करत असता. हा विचार सोबत घेऊन मी आजवरचा प्रवास केला आहे. अशाप्रकारच्या गोष्टी ऐकून मला आणखी जोमानं काम करण्याची संधी मिळाली. मी अतिशय त्वेषानं एक ध्येय गाठायचे असे ठरवले आणि ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करायला लागलो. मला जेव्हा माझ्या रंगावरुन चिडवण्यात आले तेव्हा मी काही चिडलो नाही. असा प्रकार हा काही एका छोट्या गावापुरता मर्यादित नाही तर तो पूर्ण जगाशी संबंधित आहे. ज्यावेळी कार्यक्रमाच्या दौ-याच्या निमित्तानं काही देशांमध्ये फिरण्याची संधी मिळाली तेव्हाही मला या गोष्टींचा सामना करावा लागला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT